Devendra Fadnavis: ठाकरेंसोबत बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले…
Devendra Fadnavis News: ठाकरे बंधूसोबत नेमकी काय चर्चा झाली? असा सवाल उपस्थित झाला होता. यावर देवेंद्र फडणवीसांनी मोठी माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या बंद दाराआड चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. ती चर्चा नेमकी काय होती, असा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठा खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात इलेक्ट्रिक बसेस ही आमचं प्राधान्य आहे. पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक बसेसची गरज आहेत. पिनाकेलचं मँनिफँक्चिरिंग युनिटची कँपिसीटी वाढवा, असं आम्ही सांगितलं आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षात आपल्याला 50 हजार इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत, असं ते म्हणाले आहेत. यानंतर त्यांनी चर्चेसंदर्भात मोठी माहिती दिली आहे.
ते म्हणाले की, अतिशय छान कार्यक्रम होता. हास्यरेषा हे व्यंगचित्रकारांवर पुस्तक होतं. आम्ही तिघंही साहित्यप्रेमी म्हणून तिथे गेलो होतो. तिथली भाषणं हास्य विनोद फुलवणारी भाषण होती. महाराष्ट्राची ही संस्कृती पाहायला मिळते. राजकीय दृष्ट्या अश्या कार्यक्रमात आम्ही एकत्र येवू शकतो. याला कुठला राजकीय अर्थ नाही आहे. कुठलीही बंद खोलीत बैठक नाही झाली. व्यंगचित्रकारासह आम्ही त्या खोलीत बसलो होतो. कुठलीही राजकीय चर्चा त्यात बैठकीत झाली नाही. कुठलेही वेगळे अन्वयार्थ कुणीही काढू नये, असं त्यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रदुषणमुक्त भारतासाठी इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या वाढवावी लागणार आहे. तीच गरज भागवण्याचे काम ईका कंपनी नक्कीच करेल. महाराष्ट्रात आगामी काळात एकट्या महाराष्ट्रात 50 हजार इलेक्ट्रिक बसेसची गरज भासणार आहे. पुणे हे ऑटोमोबाइल हब तर आहेच पण आता इलेक्ट्रिक व्हेईकल निर्मिती चाकणला होणार आहे. अनेक योजना सरकारने केल्या आहेत. ईव्हीचा महाराष्ट्र हब होत आहे. मोठ्या प्रमाणात ईव्हीला डिमांड आहे.
ते पुढे म्हणाले की, 2015 ला पुण्यात पीएमपीच्या बस ईव्ही घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राला पुढच्या तीन वर्षात ईव्ही 50 हजार बस हव्या आहेत. राज्यात मेक इन महाराष्ट्रातून सुरूवात करत आहात. आज जगात सगळ्यात जास्त स्कोप मॉबीलीटी महाराष्ट्रामध्ये आहे. अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळते. 50 टक्के या उद्योगात महिला आहेत. पंतप्रधान यांचा विकसित भारत स्वप्न पूर्ण होईल. आजचे सहा युनिट साठपर्यंत जातील असा विश्वास आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
