मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांच्यासोबत शिकत शिकत पुढे जाईन : आदित्य ठाकरे

| Updated on: Oct 03, 2019 | 11:30 AM

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray worli) हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक लढणारे ते पहिले ठाकरे (Aaditya Thackeray worli) ठरले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांच्यासोबत शिकत शिकत पुढे जाईन : आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray worli) हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक लढणारे ते पहिले ठाकरे (Aaditya Thackeray worli) ठरले आहेत. एरव्ही सत्तेतील चढउतार पाहणाऱ्या मातोश्री निवासस्थानी ठाकरे घरात आज काहीसं वेगळं वातावरण पाहायला मिळालं. सकाळी साडेदहाच्या सुमारास आदित्य ठाकरे फॉर्म भरण्यासाठी मातोश्रीवरुन लोअर परळच्या दिशेने निघाले. त्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आजचा दिवस खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. काम करण्याची एक्साईटमेंट आहे. आशीर्वाद देण्यासाठी सर्वजण आले आहेत.”

आजोबा बाळासाहेबांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो आहे, कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. एरव्ही शिवसैनिकांबद्दल जी भावना आहे तशीच भावना आज कुटुंबात आहे, असं आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.

आमदार की मुख्यमंत्री जे लोकांना आवडेल ते निवडतील असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

वरळीत कोणतं राजकीय आव्हान?

वरळीत आव्हान सध्या कोणतं दिसत नसलं, तरी त्यानंतरचं आव्हान वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं असेल. वरळीतील बीडीडी चाळीचा पुनर्विकास खूप वर्षांपासून रखडला आहे. जगभरातून सगळे वरळीचा विकास बघायला आणायचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा फोन

मुख्यमंत्र्यांना मी फॉर्म भरल्यानंतर फोन करणार होतो, मात्र त्यांचाच सकाळी फोन आला. त्यांनी शुभेच्छा दिल्या. आम्ही एकत्र काम करु. त्यांच्याबरोबर शिकत शिकत पुढे जाईन, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

उद्धव ठाकरेंकडून शुभेच्छा

वडिलांनी काय शुभेच्छा दिल्या? असा प्रश्न विचारल्यावर आदित्य म्हणाले, चांगलं काम कर असं त्यांनी सांगितलं.