नागपूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली (CM devendra fadnavis life threat) आहे.

Namrata Patil

|

Nov 02, 2019 | 11:11 PM

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली (CM devendra fadnavis life threat) आहे. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विमानतळावर फोन करुन एका माथेफिरु व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली असून सध्या नागपूर पोलिस याबाबतचा अधिक तपास  करत (CM devendra fadnavis life threat) आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर एका माथेफिरु व्यक्तीने एअर इंडियाच्या काऊंटरवर फोन केला. यावर माझ्या नातेवाईकांना विमानाने पोहचता आले नाही, असे सांगत ही धमकी दिली आहे. जर माझे नातेवाईक सुरक्षित आले नाहीत. तर मी मुख्यमंत्र्यांच्या जीवाचे बरं-वाईट करेन असेही या माथेफिरुने फोनवर म्हटलं आहे.

याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर विमानतळावर अशाप्रकारे फोन आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हा माथेफिरु नेमक कोण होता, त्याने हा फोन का केला, त्याचे नातेवाईक नक्की कोणत्या विमानाने येणार आहेत. याबाबतच तपास पोलिसांनी सुरु केला (CM devendra fadnavis life threat) आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्या अकोला जिल्ह्याचा दौरा करणार आहे. सकाळी 10 नंतर मुख्यमंत्री अकोल्याकडे विमानाने रवाना होतील. त्यानंतर ते म्हैसपूर फाटा, कापशी रोड, चिखलगाव यासह अन्य ठिकाणी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहे. यानंतर दुपारी 1 च्या सुमारास मुख्यमंत्र्यांची नुकसानीबाबत आढावा बैठक होणार आहे. यानंतर ते दुपारी 2 च्या सुमारास मुंबईत परततील. या दरम्यान मुख्यमंत्र्यांसाठी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें