उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी दिवसात दोन वेळा समोरासमोर येणं टाळलं?

रामदास आठवलेंच्या रिपाइंच्या मेळाव्याला मुख्यमंत्री हजर राहिले. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena bjp seat sharing) गैरहजर राहिले. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय.

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी दिवसात दोन वेळा समोरासमोर येणं टाळलं?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांसमोर (Shivsena bjp seat sharing) येण्याचं टाळलं का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण, मुंबईत गुरुवारी दुपारी एसटी महामंडळाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजर राहिले. तर मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली. मात्र रामदास आठवलेंच्या रिपाइंच्या मेळाव्याला मुख्यमंत्री हजर राहिले. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena bjp seat sharing) गैरहजर राहिले. त्यामुळे आता उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. उद्धव ठाकरे रिपाइंच्या कार्यक्रमाला आले नसले तरी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे मात्र हजर होते.

जागा वाटपाचं ठरलंय असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगत असले तरी जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरुन आता वादाला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. कारण पहिल्याच बैठकीत भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे जागा वाटपाचं कसं ठरणार? हा सवाल विचारण्याची वेळ आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेला 100 जागा देण्यास भाजपने तयारी दर्शवली आहे. तर शिवसेनेला 144 /144 चा फॉर्म्युला हवा आहे. तसंच मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा देण्याची मागणी शिवसेनेने केल्याचीही माहिती आहे.

नुकत्याच केलेल्या अंतर्गत सर्व्हेतून भाजपच्या आशा आणखी वाढल्या आहेत. कारण, भाजप किमान 160 जागांवर जिंकेल असा अहवाल समोर आलाय. त्यामुळे 160 पेक्षा अधिक जागा लढवण्यावर भाजपचा जोर आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना आता अडून बसली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *