खडसे समर्थकांचे सामूहिक राजीनामे, मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वीच आतषबाजी

| Updated on: Oct 21, 2020 | 4:05 PM

खडसेंच्या या निर्णयानंतर मुक्ताईनगरमध्ये फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. (Collective resignation of Eknath Khadse Activists for Support decision)

खडसे समर्थकांचे सामूहिक राजीनामे, मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वीच आतषबाजी
Follow us on

जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  यानंतर खडसेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे देण्याची मालिका सुरु झाली आहे. तसेच खडसेंच्या या निर्णयानंतर मुक्ताईनगरमध्ये दिवाळीपूर्वी फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. (Collective resignation of Eknath Khadse Activists for Support decision)

जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज सिंग पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. माझ्याकडे जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्षपद आहे. मी भाजपचा 2000 पासूनचा सक्रीय कार्यकर्ता आहे. आमचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर भाजपने वेळोवेळी केलेल्या अन्यायाला कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, असे शिवराज पाटील यांनी सांगितले.

शिवराज पाटील हे भाजपचे जनसंघ जिल्हाध्यक्ष, भाजप व्यापारी आघाडी सरचिटणीस, भाजप प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत होते. मात्र खडसेंच्या राजीनामाच्या निर्णयानंतर त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

इतकचं नव्हे तर जळगावातील अनेक खडसे समर्थकांनी भाजपला राजीनामे देण्याची मालिका सुरु केली आहे. अनेक कार्यकर्ते अजूनही राजीनामे देत आहे. त्यामुळे भाजपला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीत आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते  आनंदोत्सव साजरा करत आहे. जोरदार घोषणाबाजी करत फटाकेबाजी करत अनेक जण आनंदोत्सव साजरा करत आहेत.

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वत:चं ट्विटर अकाऊंटही डिलीट केलं. (Collective resignation of Eknath Khadse Activists for Support decision)

संबंधित बातम्या : 

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट