सांगलीत स्वाभिमानीकडून विशाल पाटील, रावेरमध्ये काँग्रेसकडून उल्हास पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

सांगली : आघाडीतील सांगली आणि रावेरच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. सांगलीतून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. तर राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान सांगलीतून विशाल पाटील हे 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. […]

सांगलीत स्वाभिमानीकडून विशाल पाटील, रावेरमध्ये काँग्रेसकडून उल्हास पाटील
Follow us on

सांगली : आघाडीतील सांगली आणि रावेरच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. सांगलीतून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहेत. तर राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडलेल्या रावेरमध्ये काँग्रेसने उल्हास पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान सांगलीतून विशाल पाटील हे 2 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे विशाल पाटील आता स्वाभिमानाचे बॅट्समन म्हणून मैदानात उतरणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी आणि काँग्रेसमध्ये सांगलीच्या जागेवरुन धुसफूस सुरु होती. खासदार राजू शेट्टी हे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सांगली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा केली होती.

काँग्रेसने ही जागा स्वाभिमानीला सोडल्याने वसंतदादांचं कुटुंब, माजी खासदार प्रतिक पाटील हे काँग्रेसवर नाराज झाले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यावेळी विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्धार केला. पण विशाल पाटील यांचं बंड थोपवण्यात काँग्रेस आणि स्वाभिमानीला यश आलं आहे.

प्रतिक पाटलांचा विशाल पाटलांना सल्ला

“मी काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. आताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली नाही. विशाल पाटील काँग्रेसकडून अर्ज भर, जर एबी फॉर्म नाही आला, तर तो अर्ज अपक्ष होतोय, तू अपक्ष म्हणून लढ.” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील  यांनी विशाल पाटील यांना दिला होता.

संबंधित बातम्या

काकांचा अर्ज भरताना दादांचं राजू शेट्टी, जयंत पाटलांवर टीकास्त्र  

सांगलीच्या जागेचा तिढा, प्रतिक पाटलांची समजूत काढण्यासाठी दिल्लीतून हालचाली   

… तर आम्हाला सांगलीची जागा नको : राजू शेट्टी   

वसंतदादांच्या एका नातवाची काँग्रेसला सोडचिठ्ठी, दुसरा नातू अपक्ष लढणार