सांगलीच्या जागेचा तिढा, प्रतिक पाटलांची समजूत काढण्यासाठी दिल्लीतून हालचाली

सांगली : काँग्रेसला रामराम ठोकलेले माजी मंत्री प्रतिक पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. प्रतिक पाटील यांना समजावण्यासाठी फोनवरुन संपर्क केला जातोय. सांगली महापालिकेतील काँग्रेसचे 21 नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीलासाठी रवाना झाले आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची नगरसेवकांसोबत उद्या बैठक होणार आहे. त्यानंतर सांगलीच्या जागेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. …

congress leader pratik patil, सांगलीच्या जागेचा तिढा, प्रतिक पाटलांची समजूत काढण्यासाठी दिल्लीतून हालचाली

सांगली : काँग्रेसला रामराम ठोकलेले माजी मंत्री प्रतिक पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. प्रतिक पाटील यांना समजावण्यासाठी फोनवरुन संपर्क केला जातोय. सांगली महापालिकेतील काँग्रेसचे 21 नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भेटीलासाठी रवाना झाले आहेत. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची नगरसेवकांसोबत उद्या बैठक होणार आहे. त्यानंतर सांगलीच्या जागेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

सांगली लोकसभेची जागा कोणाकडे राहणार यावरुन काँग्रेसमध्येच वाद सुरु झालाय. ही जागा स्वाभिमानीला मिळणार अशी माहिती मिळताच, काँग्रेसमध्ये नाराजी पसरली. दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तीला डावलून ही जागा दुसऱ्या पक्षाला सोडल्यामुळे आणखी रोष निर्माण झाला. वसंतदादांचे नातू नाराज प्रतिक पाटील यांनी पक्षावर राग व्यक्त करत पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

प्रतिक पाटील यांनी लहान बंधू विशाल पाटील यांना आपला उमेदवारी अर्ज भरण्याचं आवाहन केलं. त्यात काल खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसला अल्टीमेटम देत, सांगलीच्या जागेवरुन वाद होणार असेल, बंडखोरी होणार असेल तर आम्हाला ही जागा नको, जागा द्यायची असेल तर वाद मिटवून द्या, असं बजावलं.

राजू शेट्टी यांच्या अल्टीमेटममुळे काँग्रेस पक्षाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. प्रतिक पाटिल यांची नाराजी दूर करण्यासाठी दिल्लीतून वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिक पाटिल यांना समजावण्यासाठी फोनवरुन संपर्क केला जात आहे. काँग्रेसचे नुकसान होऊ नये आणि बंडखोरी होऊ नये यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सांगली महापालिकेतील काँग्रेसचे 21 नगरसेवक अशोक चव्हाण यांच्या भेटीला नांदेडच्या दिशेने निघाले आहेत. नगरसेवकांना बैठकीसाठी नांदेडला बोलावण्यात आलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *