काँग्रेसची दहावी यादी जाहीर, अखेर संजय निरुपमांनाही उमेदवारी मिळाली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : काँग्रेसने दहाव्या यादीत 26 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निरुपमांची मुंबई अध्यक्षपदावरुन गच्छंती केली जाणार आहे. एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मिलिंद देवरा […]

काँग्रेसची दहावी यादी जाहीर, अखेर संजय निरुपमांनाही उमेदवारी मिळाली
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसने दहाव्या यादीत 26 जणांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे निरुपमांची मुंबई अध्यक्षपदावरुन गच्छंती केली जाणार आहे. एकतर निवडणूक लढा किंवा पदावरुन पायउतार व्हा, असे निरुपमांना आदेश होते. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

संजय निरुपम यांच्याविषयी अनेक तक्रारी हायकमांडकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबतही साशंकता होती. अखेर दोनपैकी एक पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही निरुपमांना उमेदवारी देण्यास उत्सुक नव्हते, अशी माहिती आहे.

2014 च्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा साडे चार लाख मतांनी पराभव झाला होता. मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपच्या गोपाळ शेट्टींनी त्यांच्यावर मात केली होती. अखेर यावेळी निरुपमांना मतदारसंघ बदलून देण्यात आलाय. काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या मतदारसंघातून ते लढणार आहेत. यावेळी निरुपमांचा सामना शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्यासोबत होईल.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात अनुक्रमे 24 आणि 20 जागांवर लढणार आहे. चार जागा मित्रपक्षांना सोडण्यात आल्या आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 23 जागा जाहीर केल्या आहेत. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता फक्त पुण्यातून कोण लढणार याबाबतचा निर्णय बाकी आहे.

पाहा संपूर्ण यादी