तिकीट जाहीर केलेल्या काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

स्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचं काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी जाहीर केलंय.

तिकीट जाहीर केलेल्या काँग्रेस उमेदवाराची निवडणुकीतून माघार

सिंधुदुर्ग : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना सिंधुदुर्गातील कुडाळ-मालवण मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासात निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. स्वभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. दत्ता सामंत यांना पाठिंबा देत असल्याचं काका कुडाळकर (Congress Candidate Kaka Kudalkar) यांनी जाहीर केलंय.

दत्ता सामंत हे स्थानिक उमेदवार असून शिवसेनेचे वैभव नाईक हे बाहेरचे उमेदवार आहेत. त्यामुळे स्थानिक असलेल्या दत्ता सामंत यांना आपण ताकद देणार असल्याचं काका कुडाळकर यांनी सांगितलंय. मतांची विभागनी होऊ नये आणि त्याचा फायदा वैभव नाईक यांना होऊ नये म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं ते म्हणाले.

काका कुडाळकर हे एकेकाळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे विश्वासू सहकारी होते. नारायण राणे शिवसेनेत असल्यापासून काका कुडाळकर हे त्यांच्यासोबत सावलीसारखे असायचे. मात्र 2014 च्या निवडणुकीत नितेश राणे यांच्याशी मतभेद झाल्यामुळे माजी आमदार राजन तेली यांच्यासोबत काका कुडाळकर यांनीही राणेंची साथ सोडली होती.

निवडणूक न लढण्यावरून आणि स्वाभिमान जिल्हाध्यक्षांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे काका कुडाळकर पुन्हा एकदा नारायण राणेंची साथ देणार असल्याचं बोललं जातंय. एकूणच काका कुडाळकर यांच्या अचानक निवडणूक न लढण्याच्या निर्णयामुळे काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाल्याचं सध्या चित्र आहे. काँग्रेसकडून अरविंद मोंडकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *