मविआ नैसर्गिक आघाडी नाही, पुढच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही कार्यकर्ते ठरवतील- नाना पटोले

| Updated on: Aug 12, 2022 | 10:06 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महावविकास आघाडीतीस मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे.

मविआ नैसर्गिक आघाडी नाही, पुढच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही कार्यकर्ते ठरवतील- नाना पटोले
Follow us on

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महावविकास आघाडीतीस मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे.”विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विरोधी पक्ष नेतेपदी बसवलं. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपद आम्हाला हवं होतं. पण तेही शिवसेनेनं घेतलं. बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि घाईघाईने नेता निवडला गेला. आमची नेसर्गिक युती नाही. चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत. हे साधं बोलायला विचारायला तयार नाहीत. आमची आघाडी विपरीत परिस्थीती मध्ये झाली होती आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे.आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवावं”, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेला (Shivsena) एकप्रकारे इशाराच दिला आहे.

“मविआ नैसर्गिक आघाडी नाही, पुढच्या निवडणुका एकत्र लढायच्या की नाही कार्यकर्ते ठरवतील. अजितदादा आणि फडवीसांनी पहाटे शपथ घेतलेलं सरकार सरकार पडलं तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार सोनिया गांधीकडे गेले होते. त्यांनी प्रस्ताव ठेवला म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो. पण येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढवायच्या की नाही, याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील. आम्ही दोस्ती करतो पाठीवरवार नाही”, असंही पटोले म्हणालेत.

“देशाच्या लोकशाहीला संपवण्याचे जे काम सुरु आहे. त्याविरोधात आमची ही यात्रा आहे. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे ब्लॅकमेल सरकार आहे. मलाईदर खात्यासाठी रस्सी खेच सुरु आहे. गुजराती नेत्यांसाठी हे सरकार आहे. सत्तेचे वाटेकरी हे सगळे आहेत, हे जनतेची सरकार नाही”, असंही नाना पटोले म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्याला चांगली मदत द्यायला हवी. शिंदे आणि फडणवीस सरकार केवळ लॉलीपॉप देतंय.75 हजार पर हेक्टर मदत द्यायला हवी. अधिवेशनात आम्ही हा मुद्दा जरूर मांडू, असंही पटोले म्हणालेत.