काँग्रेस प्रभारींसमोर नितीन राऊतांची नाराजी, वनकरांच्या उमेदवारीवरुन थोरातांवर अप्रत्यक्ष टीका

| Updated on: Dec 03, 2020 | 3:47 PM

अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसतर्फे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यावरुन पक्षाच्या बैठकीत वाद झाला

काँग्रेस प्रभारींसमोर नितीन राऊतांची नाराजी, वनकरांच्या उमेदवारीवरुन थोरातांवर अप्रत्यक्ष टीका
Follow us on

मुंबई : राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आलेला असतानाच आता राज्यातही वादाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांच्यासमोरच पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली. आंबेडकरी चळवळीचे नेते अनिरुद्ध वनकर (Aniruddha Vankar) यांना विधानपरिषदेचे तिकीट देण्यावरुन ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचे वृत्त आहे. (Congress Leader Nitin Raut reportedly express displeasure with Mah President Balasaheb Thorat)

अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसतर्फे राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी देण्यावरुन पक्षाच्या बैठकीत वाद झाल्याचं वृत्त आहे. अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून काँग्रेस विरोधात निवडणूक लढवली होती, त्यांना उमेदवारी देताना पक्षात विचारणा झाली नाही, मत जाणून घेतले नाही, असा आक्षेप नितीन राऊत यांच्याकडून घेण्यात आला. काँग्रेसमधील अनुसूचित जमाती वर्गातील नेत्याला विधानपरिषदेवर संधी द्यायला हवी होती, मात्रत्याऐवजी वनकरांना उमेदवारी दिल्याची तक्रार हायकमांडकडे करण्यात आली होती.

राज्यात वंचित बहुजन आघाडीमुळे अनुसूचित जाती जमातींचा मतदार काँग्रेसपासून दूर गेला. याबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाची काल बैठक झाली. या बैठकीला नितीन राऊत, सुशीलकुमार शिंदे, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे असे नेते उपस्थित होते.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक लवकर झाले पाहिजे. भीमा कोरेगाव प्रकरणी लक्ष दिले पाहिजे, असे काही मुद्दे बैठकीत उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी चर्चेत नितीन राऊत यांनी नाव न घेता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांवर टीका केली.

कोण आहेत अनिरुद्ध वनकर?

  • अनिरुद्ध वनकर यांचं विदर्भातील साहित्य क्षेत्रात मोठं नाव
  • आंबेडकरी चळवळीतील मोठे गीतकार आणि संगीतकार

सचिन सावंत, रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांना काँग्रेसकडून विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यत्वासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आंबेडकर चळवळीतील गीतकार आणि संगीतकार असलेल्या अनिरुद्ध वनकर यांच्या नावावरुन विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं याआधीही बोललं जात होतं. (Congress Leader Nitin Raut reportedly express displeasure with Mah President Balasaheb Thorat)

बाळासाहेब थोरात काय म्हणतात?

दरम्यान, काल एच. के. पाटील यांनी मागासवर्गीय विभागाशी संवाद साधला. आज विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव आम्ही आज मंजूर केला आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

“काँग्रेसमध्ये नाराजी बोलून दाखवली जाते”

विधानपरिषदेसाठी इच्छुकांची संख्या तीनशेच्या वर होती. त्यातून चौघा जणांची नावं निवडायची होती. त्यामुळे थोडी फार नाराजी असणार, काँग्रेसमध्ये नाराजी बोलून दाखवली जाते, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

विधानपरिषद | काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, वनकर-हुसैन यांच्या उमेदवारीवर पक्षात नापसंती?

(Congress Leader Nitin Raut reportedly express displeasure with Mah President Balasaheb Thorat)