बहिरा स्वतःच्या तालावर नाचे, संजय निरुपम यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत (Sanjay Nirupam Raj Thackeray)

बहिरा स्वतःच्या तालावर नाचे, संजय निरुपम यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
राज ठाकरे, संजय निरुपम
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 11:22 AM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वाढण्यास स्थलांतरित जबाबदार असल्याचं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी निशाणा साधला आहे. “बहिरा नाचे आपन ताल!” म्हणजे “बहिरी व्यक्ती स्वतःच्याच तालावर नाचते” अशा अर्थाची टीका निरुपम यांनी केली आहे. (Congress Leader Sanjay Nirupam slams MNS President Raj Thackeray remark on blaming migrants for Corona)

राज ठाकरेंचा परप्रांतीयविरोधी सूर

मुंबईतील वाढत्या समस्यांना परप्रांतीय जबाबदार असल्याचा दावा राज ठाकरे सुरुवातीपासूनच करत आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परप्रांतीयविरोधी धोरण सर्वश्रुत आहे. गेल्या वर्षी परप्रांतीय मजूर मुंबई आणि महाराष्ट्राबाहेर जात असतानाही राज ठाकरेंनी त्यांना परत घेताना मोजणी आणि चाचणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परप्रांतीयांविषयी कायम कणव बाळगला आहे. कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पुन्हा परप्रांतीयविरोधी सूर आळवल्याने निरुपम यांनी ट्विटरवरुन राज ठाकरेंन कानपिचक्या लगावल्या.

(Sanjay Nirupam on Raj Thackeray)

कोरोना वाढीवर राज ठाकरेंची मीमांसा

“बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात” असं राज ठाकरे काल म्हणाले होते.

“राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. परंतु, त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे. कोण येतंय कोण जातंय हे कुणालाच माहीत नव्हतं. आज कोरोना आहे, उद्या आणखी काही असेल. हे दुष्टचक्र न थांबणारं आहे” असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

‘किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

(Congress Leader Sanjay Nirupam slams MNS President Raj Thackeray remark on blaming migrants for Corona)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.