AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावेळीही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पद मिळणं जवळपास कठीण

नवी दिल्ली : मोदी लाट 2.0 मध्ये काँग्रेससह इतर पक्षांचाही सुपडासाफ झालाय. भाजपने स्वबळावर 300 चा, तर एनडीएने 350 आकडा गाठलाय. काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत 44 जागा मिळाल्या होत्या, ज्यामुळे विरोधी पक्ष नेता पदही मिळू शकलं नाही. या लोकसभेलाही तिच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे 50 पेक्षाही कमी खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसला विरोधी […]

यावेळीही काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पद मिळणं जवळपास कठीण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 23, 2019 | 7:39 PM
Share

नवी दिल्ली : मोदी लाट 2.0 मध्ये काँग्रेससह इतर पक्षांचाही सुपडासाफ झालाय. भाजपने स्वबळावर 300 चा, तर एनडीएने 350 आकडा गाठलाय. काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत 44 जागा मिळाल्या होत्या, ज्यामुळे विरोधी पक्ष नेता पदही मिळू शकलं नाही. या लोकसभेलाही तिच परिस्थिती होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे 50 पेक्षाही कमी खासदार निवडून आले आहेत. काँग्रेसला विरोधी पक्ष नेता नसणे हे 2014 मध्ये पहिल्यांदाच घडलं होतं. सलग दुसऱ्यांदा काँग्रेसला हा दर्जा मिळण्यापासून वंचित रहावं लागू शकतं.

काँग्रेसला 50 पेक्षा कमी जागा मिळत असल्यामुळे विरोधी पक्ष नेता कोण होणार याकडे लक्ष लागलंय. नियमानुसार विरोधी पक्ष नेता हे पद मिळण्यासाठी 543 च्या 10 टक्के म्हणजे 55 जागांची आवश्यकता असते. एका पक्षाला एवढ्या जागा असतील तर संसदेत विरोधी पक्ष नेता पद दिलं जातं. पण इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला या पदापासून वंचित रहावं लागलं होतं.

यावेळी राहुल गांधींकडेच पक्ष नेत्याची जबाबदारी?

लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी पार पाडण्याचं काम काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे होतं. पण यावेळी कर्नाटकातील गुलबर्गामधून खर्गेंचा पराभव झालाय. लोकसभेत येणारे काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार हे केरळ आणि पंजाबमधील असतील. त्यामुळे सक्षम हिंदी भाषिक नेता या पदासाठी निवडणं हे काँग्रेससमोर आव्हान असेल. अशा परिस्थितीत राहुल गांधींचंच नाव पुढे येऊ शकतं.

2014 मध्ये काँग्रेसला विरोधी पक्ष नेता पद न मिळाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकसभेत गटनेता म्हणून निवड करण्यात आली. पाच वर्ष त्यांनी या पदावर काम केलं. अनेकदा विरोधी पक्ष नेता हे पद देण्यासाठी सरकारला विनंती केली, पण पद मिळालं नाही. यावेळी काँग्रेसला चांगल्या जागांची अपेक्षा होती. पण अर्थशतकही करता आलं नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...