Congress : कॉंग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी की आणखी कोण? निवड तोंडावर पक्षांतर्गत मतभेद काय?

| Updated on: Sep 22, 2022 | 5:32 PM

अध्यक्षपदाबाबत कॉंग्रेसने एक धोरण ठरवले आहे. ज्याच्याकडे अध्यक्षपद त्याकडे इतर कोणतेही पद असणार नाही. गेहलोत हे सध्या राज्यस्थानचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांचा कल हा मुख्यमंत्री पदाकडेच आहे.

Congress : कॉंग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी की आणखी कोण? निवड तोंडावर पक्षांतर्गत मतभेद काय?
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणु राहुल गांधी
Follow us on

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा (Congress President) अतिरिक्त पदभार हा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याकडे  आहे. आता चालू महिन्यातच कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड होत आहे. यामध्ये राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शशी थरुर आणि खुद्द राहुल गांधी याचे नाव चर्चेत आहे. मात्र, अध्यक्षपदी जरी वर्णी लागली तर राज्यस्थानचे मुख्यमंत्री पद संभाळेल असा पवित्रा गेहलोत (Ashok Gehlot) यांनी घेतला होता, पण एक व्यक्ती आणि एकच पद याची आठवण राहुल गांधी यांनी करुन दिल्यानंतर गेहलोत यांच्या भूमिकेमध्ये बदल झाला आहे. निवडणुक लढवण्यासाठी पद सोडण्याची गरज नाही, पण निवडून आले तर मात्र मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

अध्यक्षपदाबाबत कॉंग्रेसने एक धोरण ठरवले आहे. ज्याच्याकडे अध्यक्षपद त्याकडे इतर कोणतेही पद असणार नाही. गेहलोत हे सध्या राज्यस्थानचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांचा कल हा मुख्यमंत्री पदाकडेच आहे. त्यामुळे दिल्लीत दाखल झालेले गेहलोत काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री पदावर असताना अध्यक्षपदाची निवडणुक लढविता येणार आहे, पण जर यामध्ये ते जिंकले तर त्यांनी मुख्यमंत्री पद सोडावे लागणार आहे. शिवाय पक्षासाठी कोणतीही जबाबदारी स्विकारणार असल्याचे गेहलोत यांनी सांगितले आहे.

एकीकडे गेहलोत हे पक्षाची मर्जी राखत आहेत तर दुसरीकडे या पदावर राहुल गांधी यांचीच वर्णी लागावी असा आशावाद व्यक्त करीत आहेत. देशातील वातावरण आणि जनतेमधील नाराजी यामुळे राहुल गांधी यांची वर्णी लागली तर चित्र बदलेन असा विश्वास त्यांना आहे.

मात्र, अध्यपदाच्या निवडीपूर्वीच या निवडणुकीत गांधी परिवरातील व्यक्ती नसेल असे सांगण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी निवडणुकच लढवतात की नाही, हे अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे चर्चेत असलेले गेहलोत हेच त्यांना निवडणुक लढवण्यासाठी आग्रह करीत आहेत.

मी कॉंग्रेस पक्षाचा सैनिक आहे. या पक्षामुळे तीन वर्ष केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, सरचटणीस आणि दोनवेळा मुख्यमंत्री भूषविले आहे. त्यामुळे आता सर्वकाही मिळाले आहे. आता पक्ष देईल ती जबाबदारी स्विकारणार असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. तर दुसरीकडे राज्यस्थानच्या मुख्यमंत्री पदावरुन त्यांनी फिल्डिंग लावली आहे.