AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल

"भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?" असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केला आहे. (Raju Waghmare attacks Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले, काँग्रेसचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Mar 22, 2021 | 3:32 PM
Share

मुंबई : “भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला?” असा सवाल विचारत काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता गेल्यानंतर मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस, असा बोचरा वारही वाघमारेंनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला. (Congress Spokesperson Raju Waghmare attacks Devendra Fadnavis)

“भाजपच्या 22 मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप होते, कोणी राजीनामा दिला? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काळात पुलवामा हल्ला घडला, शाहांनी राजीनामा दिला का? भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते? भाजपने 2014 पासून त्यांच्या एकनाथ खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?” असा सवाल राजू वाघमारेंनी उपस्थित केला आहे.

“वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना तातडीने पायउतार व्हावे लागले. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतरही त्यांचा राजीनामा का घेतला गेला नाही?” या भाजपच्या ट्विटवर राजू वाघमारेंनी उत्तर दिलं.

“15 फेब्रुवारीला प्रेस झाली परंतु हॉस्पिटलच्या परिसरात देशमुखांना डिस्चार्ज मिळाल्यावर! खोटे बोलून संभ्रम तयार करायचा! सत्ता गेल्यानंतर काही माणसांचे मानसिक संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. भाजप नेते कृपा करून तपासून घ्या” असे टीकास्त्रही वाघमारेंनी सोडले आहे.

(Congress Spokesperson Raju Waghmare attacks Devendra Fadnavis)

“परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब फुसका! फेब्रुवारीत सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शंका! आणि भेट जरी झाली तरी 100 कोटींच्या वसुलीची बातमी खरी कशी? फक्त अधिकारी पत्र देतो म्हणून मंत्री राजीनामा देणार? गुन्हा हा जिलेटीन कार आणि मनसुख हिरेन मृत्यू तपास भरकटवून सिंग!आता भाजप स्वतःचे तोंड काळे करतील का?” असा टोलाही राजू वाघमारेंनी लगावला आहे.

काय आहे प्रकरण?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा दावा खोडून काढला आहे. देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं

देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. “देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?”, असा सवाल फडणवीस यांनी केला

संबंधित बातम्या :

मी आनंदी आहे, आता ATS करेक्ट कार्यक्रम करेल, राजधानीत शरद पवारांचा हुंकार

अनिल देशमुख यांना शरद पवारांचा खंबीर पाठिंबा, 5 मोठे मुद्दे

मग हे अनिल देशमुख कोण?; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना सवाल

अनिल देशमुखांकडे कोणतं गुपित, ज्यामुळे शरद पवारांनी 24 तासांत भूमिका बदलली? भाजप आक्रमक

(Congress Spokesperson Raju Waghmare attacks Devendra Fadnavis)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.