AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशांत ठाकूर; डॅशिंग, कार्यसम्राट आणि घराण्याचा वारसा असलेला राजकारणी!

पनवेलचे डॅशिंग आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांचं जाळं, विकासकामे, धडाकेबाज निर्णय आणि आक्रमक आंदोलनं या कार्यशैलीमुळे त्यांचा संपूर्ण तालुक्यात दबदबा निर्माण झाला आहे. (congress to bjp, know prashant thakur's political journey)

प्रशांत ठाकूर; डॅशिंग, कार्यसम्राट आणि घराण्याचा वारसा असलेला राजकारणी!
prashant thakur
| Updated on: Aug 15, 2021 | 6:53 PM
Share

मुंबई: पनवेलचे डॅशिंग आणि कार्यसम्राट आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांचं जाळं, विकासकामे, धडाकेबाज निर्णय आणि आक्रमक आंदोलनं या कार्यशैलीमुळे त्यांचा संपूर्ण तालुक्यात दबदबा निर्माण झाला आहे. तर विधानसभेत अभ्यासू आमदार म्हणूनही त्यांनी ख्याती मिळवली आहे. (congress to bjp, know prashant thakur’s political journey)

राजकारणाचा वारसा

प्रशांत ठाकूर यांच्या घरातच राजकारण आहे. वडील रामशेठ ठाकूर माजी खासदार असून राज्यातील मातब्बर नेते आहेत. प्रशांत यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतलं आहे. वाचन, पर्यटन आणि संगीत या त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत.

राजकारणात उदय

तत्कालीन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शेकापला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी पनवेल नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणली. त्यामुळे शेकापला मोठं आव्हान मिळालं. काँग्रेसमधून त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर पहिल्यांदा 2009मध्ये विजयी झाले. शेकापचे बळीराम पाटील यांचा पराभव करत प्रशांत ठाकूर विजयी झाले आणि त्यांचा राजकारणात उदय झाला. त्यामुळे काँग्रेसचा पहिल्यांदाच विधानसभेत झेंडा फडकला होता.

मंत्रिपद हुकलं

मात्र 2014मध्ये भाजपची राज्यात सत्ता येणार असल्याची चाहूल लागताच पिता-पुत्रांनी खारघर टोलनाक्याचा प्रश्न उपस्थित करून भाजपमध्ये प्रवेश केला. प्रशांत ठाकूर यांनी 2014मध्ये भाजपमधून निवडणूक लढवली आणि जिंकलेही. मात्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. 2019मध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, भाजप ऐवजी महाविकास आघाडीचं सरकार आल्याने सर्व गणितं बदलली. त्यामुळे ठाकूर यांचं मंत्रिपदाचं स्वप्नही भंगलं. मात्र, 2014मध्ये भाजपने त्यांना सिडकोचं अध्यक्षपद देऊन पक्षाचीही ताकद वाढवली होती.

शेकापला रोखलं

समाजिक कार्यापासूनच त्यांची राजकारणात सुरुवात झाली. ते पनवेलचे माजी नगराध्यक्ष आहेत. तसेच एमएमआरडीएवर ते सदस्य होते. सिडकोवरही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. सध्या ते भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पनवेल आणि उरणमधील राजकारण हे ठाकूर कुटुंबाभोवतीच फिरतं. पनवेलमध्ये शेकाप आणि शिवसेनेला रोखण्यात ठाकूर पिता-पुत्रांनी यश मिळविलेलं आहे. कोरोना काळात त्यांनी पनवेलकरांना मोठी मदत केली. पाच महिने ते नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात होते. गरजू, झोपडीट्टीधारकांना त्यांनी विशेष मदत केली. पनवेलमध्ये मोदी किचनच्या माध्यमातून त्यांनी दोन महिने गरजूंना अन्न वाटप केलं.

हॅट्रीक साधली

पनवेलमधून सलग तीनवेळा निवडून येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. पहिली निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवून ते आमदार झाले. त्यानंतर भाजपमध्ये येऊन त्यांनी दोन विधानसभा निवडणुका लढवल्या आणि दोन्ही निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळविलं.

राजकारण सोडीन, पण भाजप नाही

2019च्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर घरवापसी करणार असल्याची चर्चा होती. ते पुन्हा काँग्रेसमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण त्यांच्या एका वक्तव्याने या चर्चांना पूर्णविराम दिला. राजकारण सोडीन, पण भाजप सोडणार नाही, असं सांगून त्यांनी या अफवांना पूर्णविराम दिला होता. (congress to bjp, know prashant thakur’s political journey)

संबंधित बातमया:

टिळक घराण्याचा वारसा तरीही राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीतून; मुक्ता टिळकांची अशी आहे राजकीय कारकिर्द!

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विधानसभेला विजयाची हॅट्रीक, प्रशांत बंब यांना हे कसं शक्य झालं?; वाचा सविस्तर

बाळासाहेब थोरात: शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी… पण राजकारणावर मांड असलेला नेता!

(congress to bjp, know prashant thakur’s political journey)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा