टिळक घराण्याचा वारसा तरीही राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीतून; मुक्ता टिळकांची अशी आहे राजकीय कारकिर्द!

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना मोठा वारसा लाभला आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. (Mukta Tilak)

टिळक घराण्याचा वारसा तरीही राजकारणाची सुरुवात पालिका निवडणुकीतून; मुक्ता टिळकांची अशी आहे राजकीय कारकिर्द!
Mukta Tilak
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 7:28 AM

मुंबई: भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना मोठा वारसा लाभला आहे. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत. उच्च शिक्षित मुक्ता टिळक या पुण्याच्या माजी महापौरही राहिल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या सत्तेतील त्या पहिल्या महापौर आहेत. मुक्ता टिळक यांच्या राजकीय प्रवासावर टाकलेला हा प्रकाश. (bjp’s mla is descendant of Bal Gangadhar Tilak – Know more about Mukta Tilak)

उच्च शिक्षित राजकारणी

मुक्ता टिळक यांचं शिक्षण पुण्यातील भावे स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यांनी मानसशास्त्र या विषयातून एमए केलं आहे. शिवाय जर्मन भाषेचं शिक्षणही घेतलं आहे. तसेच त्या मार्केटिंग विषयाच्या एमबीएही आहेत. शिवाय त्यांनी पत्रकारितेचं शिक्षणही घेतलेलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी हिंदुस्थान पेट्रोलियम, आरबीआय, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, थरमॅक्स, प्रवीण मसाले आदी कंपन्यांमध्ये काम केलं.

मुंडे समर्थक ते बापट समर्थक

मुक्ता टिळक यांच्या माहेरी राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, त्यांच्यावर संघाचे संस्कार होते. टिळक घराण्यात आल्यावरच आपसूकच त्यांना राजकीय वारसा मिळाला. त्यांच्या राजकारणाची सुरुवात ही समाजकारणातून झाली. त्यांनी वॉर्डातील छोट्यामोठ्या समाजिक कामांना प्राधान्य दिलं. लोकांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. त्यातच भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी त्यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि 2002मध्ये मुक्ता टिळक यांनी पहिली निवडणूक लढवली. महापालिकेत अशा प्रकारे त्यांचा प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी सलग चार वेळा पालिका निवडणुकीत विजय मिळवला. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. महापौरपदापूर्वी त्यांनी पालिकेतील गटनेत्या म्हणून यशस्वीपणे जबाबदारी हाताळली आहे. स्थायी समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. मुक्ता टिळक यांचे पतीही भाजपमध्ये सक्रिय आहेत. मुक्ता टिळक या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जायच्या. आता त्या गिरीश बापट यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

अधिक काळ महापौरपद

पक्षातील ज्येष्ठ नगरसेविका म्हणून मुक्ता टिळक यांच्याकडे महापौरपद गेलं होतं. मुक्ता टिळक महापौर झाल्यानंतर सव्वा वर्षाचं महापौरपद अडीच वर्षाचं करण्यात आलं. त्यातच विधानसभा निवडणूक लागल्याने त्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे भाजपच्या सत्तेतील पहिल्या महापौर असतानाच सर्वाधिक काळ महापौरपदी राहण्याचं भाग्यही त्यांना लाभलं. प्रदीर्घ काळ पुणे महापालिका गाजवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा 2019मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. कसबा मतदारसंघातून त्यांनी तिकीट लढवली आणि त्या विजयीही झाल्या. (bjp’s mla is descendant of Bal Gangadhar Tilak – Know more about Mukta Tilak)

संबंधित बातम्या:

राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विधानसभेला विजयाची हॅट्रीक, प्रशांत बंब यांना हे कसं शक्य झालं?; वाचा सविस्तर

बाळासाहेब थोरात: शांत, संयमी, मनमिळावू, समन्वयी… पण राजकारणावर मांड असलेला नेता!

उपमहापौर ते थेट मंत्री; ‘जायटं किलर’ विद्या ठाकूर यांचा पॉलिटिकल ग्राफ वाचा!

(bjp’s mla is descendant of Bal Gangadhar Tilak – Know more about Mukta Tilak)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.