
मुंबई: त्यांनी अरुणाचल प्रदेश, झारखंड या सगळ्या ठिकाणी असेच प्रयत्न केले. हा संविधानाचा खिलवाड आहे. मी हे सगळं खूप पाहिलेलं आहे. माझा विश्वास आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेत (Shivsena) एकता राहील. उद्या नंतर परवा येतो. हे सगळं पैसा आणि पोस्टचं राजकारण आहे. उद्धव ठाकरेंना कोरोनाची (Uddhav Thackrey Corona) लागण, त्यामुळे मीटिंग झाली नाही. या सगळ्यात काँग्रेस शिवसेनेसोबत आहे, “शिवाजी महाराज के प्रदेश को कलंकीत नही करेंगे” असं म्हणत काँग्रेस नेते कमलनाथ (Congress Leader Kamalnath) यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलीये. कमलनाथ यांच्या पाठोपाठ बाळासाहेब थोरातांनी सुद्धा सरकार अस्थिर नाही अशा विश्वास व्यक्त केलाय.
दरम्यान, आरोपांचं खडण करताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत हे आमचे नेते आहेत, असंही नमूद केलेलं होतं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या कोणत्याही मागण्या नाही. ते लवकरच परत येतील, अशी माहिती बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिलेली होती. जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं होतं.
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचं हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायंचय. त्यासाठी आम्ही सगळे आमदार एकत्र आलेलो आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. हिंदुत्वासाठी सत्तेची लाचारी पत्करणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत 40 हून अधिक आमदार हे आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. एकूण 46 आमदार आमच्या सोबत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे विधानसभा बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचं ट्वीट करत संजय राऊतांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाही, असंही ते म्हणालेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि हळूहळू आमदार परतत आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.