Shiv sena Letter : मोठी बातमी, बंडखोर आमदारांवर कारवाईला सुरुवात, 5 वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे पक्ष प्रतोदांचे आदेश, पत्रं जशास तसं

Shiv Sena MLA : शिवसेनेच्या आमदारांना पत्र पाठवण्यात आली आहे. पाच वाजता शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Shiv sena Letter : मोठी बातमी, बंडखोर आमदारांवर कारवाईला सुरुवात, 5 वाजेपर्यंत मुंबईत दाखल होण्याचे पक्ष प्रतोदांचे आदेश, पत्रं जशास तसं
शिवसेनेचं पत्र
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 2:27 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शिवसेना पक्षाच्या वतीनं एक पत्र पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु (Sunil Prabhu) यांनी हे पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना (Shiv sena MLA) पाठवलं आहे. त्यामुळे अखेर शिवसेना आता आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेच्या आमदारांना पत्र पाठवण्यात आली आहे. पाच वाजता शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरिही मुंबईत येण्यास आमदारांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता न येणाऱ्या आमदारांवर शिवसेनेकडून कारवाईचा का बडगा उगारला जातो, हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

शिवसेना आमदारांना पाठण्यात आलेल्या या पत्रामध्ये काय लिहिलंय? ते जाणून घेउयात, वाचा सुनिल प्रभु यांनी पाठवेललं पत्र जशाच तशं…

नेमकं काय लिहिलंय पत्रात?

शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालय

हे सुद्धा वाचा

दि. 22 जून 2022

प्रति

श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई पाटण विधानसभा

विषय: शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची सूचना

पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. 22 जून, 2022 रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई 400006 येथे सायंकाळी 05.00 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी.

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस.एम.एस. द्वारेही कळविली आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही.

सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सुनिल प्रभु

मुख्य प्रतोद

शिव सेना विधीमंडळ पक्ष

शिवसेनेचं पत्र

वाचा काय लिहिलंय…

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : महाविकास आघाडी विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार

एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण 46 आमदार असल्याचं कळतंय. यात अपक्ष आमदारांचाही समावेश आहे. गटनेते पदावरून हटवल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना आपली खदखदही बोलून दाखवली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, प्रत्येक पक्षाच्या अंतर्गत बैठका, या सगळ्या घडामोडींना वेग आलाय.

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.