AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, ‘हे ‘ प्रकरण पुन्हा तपासाला येणार

खडसे यांची पुन्हा एकदा एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टाने हे प्रकरण पुन्हा एकदा सविस्तर तपासाला घ्यावं, असे आदेश दिले आहेत.

एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ, 'हे ' प्रकरण पुन्हा तपासाला येणार
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 21, 2022 | 2:13 PM
Share

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील (Pune) भोसरी जमीन प्रकरणाचा पुन्हा एकदा सविस्तर तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसेंना पुन्हा एकदा या तपासाला सामोरं जावं लागणार असल्यची शक्यता आहे. महसूल मंत्री असताना पुण्याजवळील भोसरी (Bhosri) येथील जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप खडसे यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.   या प्रकरणी मला क्लिन चीट मिळाल्याचं एकनाथ खडसे यांनी वारंवार माध्यमांसमोर सांगितलंय,  मात्र कोर्टानं पुन्हा एकदा हे प्रकरण तपासण्याचे आदेश दिले आहेत.

एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना  2016मध्ये पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसी भागातील 3 एकरचा भूखंड पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा भूखंड त्यांनी 3  कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. खडसे यांनी हा भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

लाचलुचपत विभागाच्या वतीने या प्रकरणी खडसे यांची चौकशीही झाली होती. त्यानंतर आपल्याला क्लिन चीट मिळाल्याचं खडसे यांनी म्हटलं होतं. खडसे यांची पुन्हा एकदा एसीबी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. त्यानंतर आज कोर्टाने हे प्रकरण पुन्हा एकदा सविस्तर तपासाला घ्यावं, असे आदेश दिले आहेत.

Follow Us
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...