Crisis in Uttarakhand BJP|उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय? दोन वजनदार मंत्री, 4 आमदारांनी पक्ष का सोडला?

| Updated on: Dec 25, 2021 | 9:50 AM

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनेक नेते 2022 मध्ये नक्की पक्षांतर करणार असे भाकित वर्तवले जात होते. यापूर्वी यशपाल आर्य यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसची वाट धरलीय.

Crisis in Uttarakhand BJP|उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे का खातेय? दोन वजनदार मंत्री, 4 आमदारांनी पक्ष का सोडला?
हरक सिंह
Follow us on

डेहराडूनः ऐन निवडणुकीच्या तोंडावर उत्तराखंडमध्ये भाजपची बोट हेलकावे खाताना दिसतेय. कारण उत्तराखंडचे ज्येष्ठ मंत्री आणि राज्यातले मातब्बर नेते हरक सिंह रावत यांनी पदाचा तडकाफडकी दिलेला राजीनामा. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यांत 2 मातब्बर मंत्र्यांसह 4 आमदारांनी भाजपला रामराम ठोकलाय. त्यात यशपाल आर्य, संजीव आर्य यांचा समावेश आहे. यामुळे देवभूमीतले राजकारण ढवळून निघाले आहे. जाणून घेऊयात इथल्या या अतिशय महत्त्वाच्या राजकीय घडामोडीमागची बित्तमबातमी…

अन् कॅबिनेट बैठक सोडूनच निघाले…

उत्तराखंडमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ मंत्री हरक सिंह यांनी पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर हरक सिंह यांचे अत्यंत निकटचे आणि डेहराडूनच्या रायपूर विधानसभा जागेवरील उमेश शर्मा काऊ यांनी राजीनामा दिला. पाठोपाठ दोन नेत्यांनी राजीनामा दिल्याने पक्ष ढवळून निघाला आहे. भाजपसाठी हा मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. हरक सिंहांची नाराजी इतकी टोकाची होती की, त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या कॅबिनेट बैठकीत राजीनामा देणार असल्याचे सुतोवाच केले.

राजीनाम्याचे कारण काय?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार रावत यांनी कोटद्वारमध्ये मेडिकल कॉलेज व्हावे, असा प्रस्ताव दिला होता. त्यांची खूप दिवसांपासून ही मागणी होती. मात्र, हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांनी थेट बैठक सोडून राजीनामा दिल्याचे समजते. हरक सिंह यांचे गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपच्या नेत्यांसोबत अनेक मुद्द्यावर पटत नव्हते. मात्र, जेव्हा मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव फेटाळण्यात आला, तेव्हा त्यांचा स्वाभिमान जागृत झाला. त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी माध्यमांशी बोलतानाही आगपाखड केली. मला पक्षात भिकाऱ्यासारखे केले होते. आता मी यांच्यासोबत काम करू इच्छित नाही, अशी टोकाची भाषा केली. यावेळी त्यांना रडूही आवरले नाही.

सतपालांना मानसन्मान…

खरे तर हरक सिंह 2016 मध्ये भाजपमध्ये आले. त्यांच्यासोबतच काँग्रेसमधून सतपाल महाराजही भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले. भाजपमध्ये रावत यांच्याऐवजी सतपाल महाराजांना जास्त मानसन्मान मिळायचा. त्यामुळेही ते नाराज असल्याचे समजते. आता हरक सिंह पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या तरी सुरू आहे. त्यांच्यापाठोपाठ अजून तीन आमदार राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत. इतर दोन मंत्री आणि आमदारांनाही भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळायची. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडल्याचे समजते.

काँग्रेसच्या रावतांना ठरणार डोकेदुखी 

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अनेक नेते 2022 मध्ये नक्की पक्षांतर करणार असे भाकित वर्तवले जात होते. यापूर्वी यशपाल आर्य यांनी पक्षाला रामराम ठोकत काँग्रेसची वाट धरलीय. हरक सिंह यांचे काँग्रेसमध्ये असताना हरीश रावत यांच्यासोबत सूत जुळायचे नाही. आता हेच रावत काँग्रेसच्या प्रचार कमिटीचे प्रमुख आहेत. जर हरक सिंह पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये गेले, तर हरीश रावत यांच्यासाठी ती डोकेदुखी ठरू सकते.

इतर बातम्याः

Harak Singh Rawat : भिकारी करुन टाकलं, भाजप कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रीमंडळ बैठकीतच राजीनामा, बाहेर ढसाढसा रडले

Happy Birthday Raju Srivastav | अभिनयाच्या वेडापायी मुंबईत आला, आर्थिक तंगीत रिक्षा चालवली अन् एका प्रवाशामुळे बदललं राजू श्रीवास्तवचं नशीब!