Harak Singh Rawat : भिकारी करुन टाकलं, भाजप कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रीमंडळ बैठकीतच राजीनामा, बाहेर ढसाढसा रडले

बैठकीतून बाहेर आल्यानंतर हरकसिंह रावत यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. ते चांगलेच रडत होते. ह्या लोकांनी भिकारी करुन टाकल्याचं वक्तव्यही त्यांनी केल्याचं वृत्त आहे. स्वत:च्याच सरकारनं तेही कॅबिनेट मंत्री असताना त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. त्या अगतिकतेतूनच त्यांना रडू कोसळल्याचं सांगितलं जातंय.

Harak Singh Rawat : भिकारी करुन टाकलं, भाजप कॅबिनेट मंत्र्याचा मंत्रीमंडळ बैठकीतच राजीनामा, बाहेर ढसाढसा रडले
Harak Singh Rawat
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 8:41 AM

नवी दिल्ली: भाजपच्या उत्तरखंड सरकारमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर वादळ उठलंय. हे वादळ आहे हरकसिंह रावत नावाचं. रावत हे कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले. अर्थातच बैठकीच्या दरम्यानच त्यांनी राजीनामाही देऊन टाकला. बैठकीतून बाहेर आले तर ते ढसाढसा रडले. गेल्या पाच वर्षापासून रावत हे स्वत:च्या क्षेत्रात एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते आणि ही मागणी पूर्ण झाली नाही. त्याच पार्श्वभूमीवर हे राजकीय वादळ उठलेलं आहे.

भिकारी केलं

हरकसिंह रावत हे तसे पहिल्यापासून बंडखोर वृत्तीचे मानले जातात. गेल्या पाच वर्षापासून ते त्यांचं क्षेत्र असलेल्या कोटद्वारमध्ये एका मेडीकल कॉलेजची मागणी करत होते. हाच मुद्दा त्यांनी सरकारमध्ये कित्येक वेळेस मांडला पण त्यांची मागणी काही पूर्ण झाली नाही. उत्तराखंडमध्ये अवघ्या काही महिन्यात लागोपाठ मुख्यमंत्री येत राहीले पण हरकसिंह रावत यांच्या मागणीकडे प्रत्येकानं दूर्लक्ष केल्याचं सांगितलं जातंय. शेवटी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हाच मुद्दा मांडला तर तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यावरुन मग त्याच बैठकीत त्यांनी राजीनामा दिला आणि बाहेर पडले. बैठकीतून बाहेर आल्यानंतर हरकसिंह रावत यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. ते चांगलेच रडत होते. ह्या लोकांनी भिकारी करुन टाकल्याचं वक्तव्यही त्यांनी केल्याचं वृत्त आहे. स्वत:च्याच सरकारनं तेही कॅबिनेट मंत्री असताना त्यांची मागणी पूर्ण होत नव्हती. त्या अगतिकतेतूनच त्यांना रडू कोसळल्याचं सांगितलं जातंय.

हरकसिंह रावत पुन्हा काँग्रेसमध्ये?

हरकसिंह रावत हे बंडखोर नेते म्हणूनच ओळखले जातात. 2016 साली त्यांनी काँग्रेसमध्ये असताना बंडखोरी केली. तत्कालीन हरीश रावत सरकारविरोधात हे बंड होतं. हे बंड एवढं मोठं होतं की सरकार पडलं. नंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. तेच हरकसिंह रावत पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची चिन्ह आहेत. अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही. पण दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नसल्याचं दिसतंय. उत्तराखंड मध्ये पुढच्या काही काळात विधानसभा निवडणूका आहेत. भाजपानं तिथं काही महिन्याच्या अंतरानं तीन मुख्यमंत्री बदलले. त्यानंतर आता हरकसिंह रावत यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. म्हणजेच उत्तरखंडमधलं राजकीय नाट्य संपताना दिसत नाहीय. त्यातच केजरीवालांच्या आपनं गोव्यासह उत्तराखंडमध्ये शड्डू ठोकलाय. त्यामुळे रावत तिकडे तर जाणार नाहीत ना अशीही चर्चा आहे.

इतर बातम्या:

Election : केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक, 5 राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेकडं लक्ष; अलाहाबाद हायकोर्टाचा सल्ला निर्णायक ठरणार?

Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.