AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा’! ‘सामना’मधून पुन्हा हल्लाबोल

'सामना'मधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

'मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचवा'!  'सामना'मधून पुन्हा हल्लाबोल
| Updated on: Nov 02, 2022 | 10:27 AM
Share

मुंबई : ‘सामना’मधून (SAMANA) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे, फडणवीस सरकारवर टीका करण्यात आली आहे. राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.’महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’या मोदी यांच्या घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला व 20 पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? तेही करा. कारण आजही गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही’, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

‘महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव’

‘सामना’मध्ये पुढे म्हटलं आहे की,’ महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे रष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे. पण आपले मिंधे मुख्यमंत्री निर्विकारपणे सांगतात. ‘भाजप सोबत आल्याने मी आज समाधानी आहे’ छान! महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले असे सेनापती बापट का सांगून गेले ते आता स्पष्ट झाले. मिंध्यांपासून महाराष्ट्राला वाचला!’ असा घणाघात सामनामधून करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राच्या नशिबी नपुंसक सरकार ‘

‘महाराष्ट्राच्या नशिबी एक नपुंसक सरकार आले आहे व महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक असे उद्योग पळविले जात आहेत. वेदांता फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. साधारण दीड लाख कोटींची गुंतवणूक राज्यात होणार होती. व एक लाखावर लोकांना रोजगार मिळण्याची खात्री होती. हा प्रकल्प केंद्राने गुजरातकडे खेचून नेला. त्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच टाटा एअरबस हा बावीस हजार कोटींचा प्रकल्प किडनॅप करून गुजरातेत नेल्याने महाराष्ट्रावर मोठाच आघात झाला आहे. प्रकल्प ठरवून मोदी- शहा यांच्या गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत, व त्या किडनॅपिंगवर राज्याचे मिंधे मुख्यमंत्री तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत’ अशी टीका समानामधून करण्यात आली आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना