Video: दत्तात्रय भरणेंचा मनसोक्त डान्स व्हायरल, राष्ट्रवादी पुन्हा वरील डान्स एकदा बघाच

| Updated on: Dec 05, 2021 | 7:21 AM

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

Video: दत्तात्रय भरणेंचा मनसोक्त डान्स व्हायरल, राष्ट्रवादी पुन्हा वरील डान्स एकदा बघाच
दत्तात्रय भरणे
Follow us on

पुणे (इंदापूर) : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. दत्तात्रय भरणे काल इंदापूर (Indapur) तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका युवकाच्या लग्नानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळद समारंभास भेट दिली. यावेळी युवकांकडून दत्तात्रय भरणे यांना डान्स करण्याचा आग्रह करण्यात आला. अखेर भरणे त्यांचा आग्रह मोडू शकले नाहीत. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना युवकांनी खांद्यावर उचलून घेतलं.

दत्तात्रय भरणेंचा मनसोक्त डान्स

हळद समारंभ भेट देण्यास आलेले राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मनसोक्त डान्स केला. दत्तात्रय भरणे युवकांचा आग्रह मोडू शकले नाहीत. तालुक्यातील त्यांच्या समर्थकांकडून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी पुन्हा गाण्यावर भरणेंचा डान्स

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. आज रात्री इंदापूर शहरातील बेपारी कुरेशी परिवाराचा हळदी समारंभ होता. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आली असता उपस्थित युवकांनी त्यांना डान्स करण्याचा आग्रह केला. यावेळी युवकांना आग्रहास्तव राज्यमंत्र्यांनी ही मनसोक्त नाचण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे युवकांनी या वेळी भरणे यांना खांद्यावर ती उचलून घेत खूप वेळ त्यांना नाचविले.

राजकीय नेत्यांकडून लग्नांना हजेरी

कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं राज्यात सध्या पुन्हा एकदा लग्नराई जोरदार सुरु झाली आहे. राजकारण्यांच्या समर्थकांकडून लग्न आणि इतर समारंभासाठी आमदार, खासदार यांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात येते. राजकीय नेते देखील कार्यकर्त्यांना नाराज न करता लग्न समारंभात उपस्थित राहतात.

इतर बातम्या:

राम के नाम, JNU पुन्हा चर्चेत, प्रशासनाच्या तीव्र विरोधानंतरही JNUSU नं डॉक्युमेंटरी दाखवली

Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

Dattatray Bharane dance viral on social media