Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी

अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या जिल्ह्यात 5 डिसेंबरपासून जमावंबदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय.

Omicron Update | ओमिक्रॉनचा धसका ! या जिल्ह्यात राज्यातील पहिली जमावबंदी; रॅली, धरणे, आंदोलनावर बंदी
CORONA AND CURFEW
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 10:32 PM

अकोला : कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात ओमिक्रॉन विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळल्यामुळे आरोग्य विभाग, राज्य सरकार तसेच प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावेत असे आवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. या जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून जमावंबदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय.

जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला पहिलाच जिल्हा

ओमिक्रॉन ही नवी कोरोना विषाणूची प्रजाती आढळून आल्याने संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी अकोला जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध लावले जात आहेत. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूनंतर जमावबंदीसारखे निर्बंध लावणारा अकोला हा पहिलाच जिल्हा आहे. या विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत.

रॅली, धरणे, आंदोलनांना बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यात 4 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून पासून शहरी व ग्रामिण भागात जमावबंदीचा आदेश लागू असेल. या काळात कोणत्याही प्रकारची रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनावर बंधी असेल.

कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात शिरकाव

कर्नाटकात ओमिक्रॉन विषाणूने बाधित असलेल्या दोन व्यक्ती सापडल्यानंतर राज्यात खबरदारी घेतली जात होती. त्यातही डोंबिवलीत ओमिक्रॉन विषाणूने बाधित एक रुग्ण आढळला आहे. त्याला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र राज्यात ओमिक्रॉनाचा शिरकाव झाल्यामुळे आता जिल्हा पातळीवरील यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याची प्रचिती अकोला जुल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशातून आली आहे. या काळात आता धरणे, आंदोलन, रॅली, मोर्चा अशा गर्दी वाढवणाऱ्या कार्यक्रमांना बंदी असेल.

डोंबिवलीत आढळलेल्या रुग्णाने लस घेतलेली नव्हती

डोंबिवलीतील ओमिक्रॉनची लागण झालेल्या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक 24 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला होता. अन्य कोणतीही लक्षणं त्याच्यात आढळून आली नाहीत. त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरुपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या 12 अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजन कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत.

नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही

दरम्यान, ओमिक्रॉन विषाणूचा संसर्गदर जास्त असला तरी मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेले आहे. ओमिक्रॉन विषाणूची आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना तसेच आयसीएमआर सूचना देतील. पण राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असला तरी पॅनिक होण्याची गरज नाही, असे टोपे यांनी सांगितलेले आहे.

इतर बातम्या :

‘फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला

उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका

Non Stop LIVE Update
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.