उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका

केंद्र सरकारने उत्तराखंडच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत आज 18 हजार कोटींहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. आता बद्रीनाथ जीचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपा होईल आणि चांगल्या सुविधांमुळे पर्यटनाला फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रु प्रकल्पांची पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी, 10 वर्षे काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केल्याची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक केलं गेलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये (Dehradun, Uttarakhand) 18 हजार कोटी रुपयांच्या योजनांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यामध्ये केदारनाथ (Kedarnath) पुनर्बांधणी आणि चारधामला (chardhaam) जोडणाऱ्या ‘ऑल वेदर रोड’ प्रकल्पाची (All Weather Road project) पायाभरणी, 1695 कोटी रुपयांच्या पांटा साहिब ते बल्लूपूर चौकापर्यंतचा रस्ता प्रकल्पाची पायाभरणीचा समावेश आहे. या 50 किलोमीटर लांबीच्या मार्गाने हिमाचल प्रदेश ते डेहराडून हा प्रवास सोपा होणार आहे. कुंभनगरी हरिद्वारमध्ये आधुनिक वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणीही त्यांनी केली. यातून तरुणांना दर्जेदार शिक्षण, रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.

मोदींचा मागील सरकारावर जोरदार हल्ला

उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, उत्तराखंड ही देशाच्या श्रद्धेसोबतच कर्माची आणि कठोरतेची भूमी आहे. आज ज्या योजनांचा शुभारंभ झाला आहे, त्या योजना राज्याच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ते म्हणाले. जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी मागील सरकारांवरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, देशात पायाभूत सुविधांच्या नावावर 10 वर्षे घोटाळे झाले. यासोबतच सरकार कोणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकारने उत्तराखंडच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. याअंतर्गत आज 18 हजार कोटींहून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. आता बद्रीनाथ जीचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि सोपा होईल आणि चांगल्या सुविधांमुळे पर्यटनाला फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 जिंकण्यासाठी काँग्रेसनेही आपली पूर्ण ताकद लावली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी 16 डिसेंबर रोजी डेहराडूनमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी ही माहिती दिली आहे.

इतर बातम्या

Uniform Civil Code: समान नागरी संहिता विधेयक 2024 पूर्वी संसदेत आणले पाहिजे- जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?

Published On - 7:19 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI