राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?

रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यानेच गडावरती हेलिकॉप्टर उतरावे लागत आहे. रोप सक्षम नसल्याचा दाखला महाराष्ट्र सरकारनेच दिला आहे. त्यामुळे गडावर हेलिपॅड बनवावे लागले. होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्यावर धुळ जाणार नाही याची योग्य खबरदारी घेतली आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरते तेव्हा धुळ उडलेली चालते आणि रायगडावर काळजी घेतली तरी चर्चा का? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारलाय.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?
संभाजीराजे छत्रपती, रायगड किल्ला
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 4:27 PM

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला दुर्गराज रायगडावर (Raigad) येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवा वाद समोर येत आहे. राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावर उतरणार आहे. मात्र, काही शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देशाचे राष्ट्रपती महाराजांना अभिवादन करणार असल्याने संपूर्ण जमगाचे लक्ष केंद्रीत होईल. मी महाराजांचा वंशज आहे. गडावरती काहीही चुकीचे होऊ देणार नाही. रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यानेच गडावरती हेलिकॉप्टर उतरावे लागत आहे. रोप सक्षम नसल्याचा दाखला महाराष्ट्र सरकारनेच दिला आहे. त्यामुळे गडावर हेलिपॅड बनवावे लागले. होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्यावर धुळ जाणार नाही याची योग्य खबरदारी घेतली आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरते तेव्हा धुळ उडलेली चालते आणि रायगडावर काळजी घेतली तरी चर्चा का? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारलाय.

जिल्हा प्रशासनाची शिवप्रेमींसोबत बैठक, वादावर पडदा

दरम्यान, जिल्हा प्रशासनानं शिवप्रेमींसोबत बैठक घेत वादावर पडदा टाकला आहे. आता राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावर होळीच्या माळावरच उतरणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपतींना रायगडावर भेट देण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर 6 डिसेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद रायगडावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत.

होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरवण्यास नेमका विरोध का?

रायगडावरील नगारखान्याच्या बाजूला होळीचा माळ आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. 1996 पूर्वीपर्यंत त्याजवळ हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या वाऱ्यानं धूळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जायची. शिवप्रेमींनी यामुळं आंदोलन करुन होळीच्या माळावरील हेलिपॅड काढायला लावलं होतं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचं निश्चित झाल्यानंतर शिवप्रेमींनी विरोध केला होता. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर होळीच्या माळावरुन हेलिपॅड काढून टाकावे, अशी मागणी शिवप्रेमींनी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1671 मध्ये याठिकाणी होळीचा सण साजरा केल्याचं काही अभ्यासकांचं मत आहे.

माणगाव ते पाचाड रस्ता पर्यटकांना बंद

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडला भेट देण्यासाठी येणार असल्यानं पोलीस दलानं सुरक्षेसाठी कंबर कसलीय. पोलीस दलाकडून सुरुक्षेच्या दृष्टीनं पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांना रायगडावर येण्यास 3 ते 7 डिसेंबर या काळात प्रवेश बंदी करण्यात आलीय. तर, रायगड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. माणगाव घरोशीवाडी मार्गे पाचड रोड तसेत नातेगाव ते पाचड मार्ग देखील सुरक्षेसाठी पर्यटकांना बंद करण्यात आला आहे.

इतर बातम्या :

काँग्रेसला डावलणं म्हणजेच फॅसिस्ट वृत्तीला बळ देणं; बाळासाहेब थोरातांचा ममतादीदींवर निशाणा

मुलाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या, मृतदेहाजवळ रडत बसलेल्या पित्याचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.