मुलाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या, मृतदेहाजवळ रडत बसलेल्या पित्याचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू

मुलाने आत्महत्या केल्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेला पिता, रेल्वे रुळांवरच मुलाच्या मृतदेहाजवळच रडत बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. मध्य प्रदेशात ही दुर्दैवी घटना समोर आली आहे

मुलाची रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या, मृतदेहाजवळ रडत बसलेल्या पित्याचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 2:43 PM

भोपाळ : मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृतदेहाजवळ शोक करत बसलेल्या वडिलांवरही काळाने घाला घातला. मुलाने रेल्वे ट्रॅकवर उडी घेत आयुष्य संपवलं. पोटच्या पोराचा निष्प्राण देह पाहून धक्का बसलेला 60 वर्षीय बाप तिथेच धाय मोकलून रडत होता. त्यावेळी त्यालाही रेल्वेने धडक दिली आणि पिताही गतप्राण झाला. मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.

मुलाने आत्महत्या केल्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेला पिता, रेल्वे रुळांवरच मुलाच्या मृतदेहाजवळच रडत बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ट्रेनची जोरदार धडक

वडिलांच्या दोघा भावांनी ट्रेन जवळ येत असल्याचं त्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र शोकमग्न असलेल्या पित्याला कुठलाच आवाज ऐकू न गेल्यामुळे तो तिथेच थांबला होता. अखेर ट्रेनने त्याला जोरदार धडक दिली, अशी माहिती होशंगाबादचे पोलीस अधीक्षक गुरुकरण सिंह यांनी दिली.

कौटुंबिक वादावादीनंतर टोकाचं पाऊल

मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील शोहागपूर शहरात हे कुटुंब राहत होतं. घरात जोरदार वादावादी झाल्यानंतर 36 वर्षांचा धाकटा मुलगा तावातावाने घराबाहेर पडला. निघतानाच त्याने जीवाचं बरं-वाईट करण्याची भाषा बोलून दाखवली होती. त्यामुळे वडील आणि दोन काका त्याच्या मागोमाग घरातून निघाले होते.

धावत्या ट्रेनसमोर मुलाची उडी

घरापासून काही अंतरावरच असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मुलगा गेला. धावत्या ट्रेनसमोर त्याने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी डोळ्यादेखतच मुलाच्या मृत्यूचं तांडव पाहिलं होतं. त्यामुळे तो जोरजोरात मृतदेहाजवळ रडत होता. इतक्यातच ट्रेन आली आणि तिने पित्याला उडवलं. होत्याचं नव्हतं झालं.

मयत पितापुत्र शोहागपूरमध्ये फर्निचरचं दुकान चालवत होते. तर 38 वर्षांचा मोठा मुलगा 70 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या होशंगाबादमध्ये राहत होता. ऑटोप्सीनंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत बायकोची हत्या, नाशिकला जाऊन विषप्राशन, बायकोच्या माहेरच्यांनीच नवऱ्याला नेलं रुग्णालयात

चारवेळा गर्भपात, सासरचे टोमणे, पोटच्या पोरीला मारणाऱ्या ‘वैरीण माते’ने हत्येची कारणं सांगितली

कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.