CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

टवाळखोरांनी धारदार हत्याराने विद्यार्थ्यावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील वावरे महाविद्यालयाच्या समोर ही घटना घडल्याची माहिती आहे.

CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
नाशकात विद्यार्थ्यावर हल्ला

नाशिक : नाशिकमध्ये विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत महाविद्यालयाबाहेर गप्पा मारत बसलेला असताना विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेचा संपूर्ण थरार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

टवाळखोरांनी धारदार हत्याराने विद्यार्थ्यावर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तम नगर परिसरातील वावरे महाविद्यालयाच्या समोर ही घटना घडल्याची माहिती आहे. यश सिंग असं हल्ला झालेल्या जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुचाकीस्वार टवाळखोरांचे सपासप वार

यश महाविद्यालय परिसरात आपल्या दोन मित्रांच्या सोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या टवाळखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये यश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

याआधी, दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमधील झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील शाळेत ऑक्टोबर महिन्यात हा थरारक प्रसंग घडला होता. 15-16 वर्षांच्या मुलांनी त्यांच्याच वयाच्या विद्यार्थ्याचा जीव घेतल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे मालकाला पडले महागात ; कामगाराने पेटवले थेट दुकान

दुसऱ्या लग्नाला विरोध करणाऱ्या आजीची मुंबईत हत्या, सात वर्षांनी नातू तिसऱ्या बायकोसोबत सापडला

प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा

Published On - 11:55 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI