AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्मघातकी स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट

या धमकी मुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

आत्मघातकी स्फोट घडवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट
| Updated on: Oct 02, 2022 | 5:32 PM
Share

दिनेश दुखंडे, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी आहे. मुख्यमंत्र्याना पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकी मुळे एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तपास यंत्रणा देखील कामाला लागल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर एक निनावी फोन देखील आला होता. या फोनद्वारे देखील धमकी देण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी आलीय. गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्यावेळेस देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी आलेली होती.

या धमकी प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक पावले उचलली जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने गृहखाते अत्यंत सतर्क झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगीतले.

मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता वाढत आहे. तसेच त्यांनी पीएफआय संघटनेविरोधात केलेल्या कारवाईमुळे त्यांच्याविरोधात कट रचला जात असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी केला आहे.

धमकीच्या फोन मध्ये काय म्हटलं. पत्रात नेमक काय आहे याबाबत तपास यंत्रणांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जाते आहे. कोणीही अधिकृतरित्या यावर बोलायला तयार नाही.

आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री हे पंढरपूरला गेले होते. तिथे खूप मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी असते. या गर्दीमध्ये आत्मघाती स्फोट घडवून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्लॅन होता.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.