Deepak Kesarkar : मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद घरात ठेवलं ही गद्दारी नव्हती का?; दीपक केसरकरांचा थेट आदित्य ठाकरेंना सवाल

| Updated on: Aug 20, 2022 | 4:51 PM

Deepak Kesarkar : राज्यात जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कौल दिला नव्हता. बाळासाहेबांनी कधीही सत्तेची इच्छा बोलून दाखवली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा कधीही मंत्री झालेला नाही. पण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडलं. राज्यात यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं.

Deepak Kesarkar : मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद घरात ठेवलं ही गद्दारी नव्हती का?; दीपक केसरकरांचा थेट आदित्य ठाकरेंना सवाल
मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद घरात ठेवलं ही गद्दारी नव्हती का?; दीपक केसरकरांचा थेट आदित्य ठाकरेंना सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना (shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मिळेल तिथे शिंदे गटाच्या आमदारांची गद्दार म्हणून अवहेलना करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. सातत्याने गद्दारीचा ठपका मारण्यात येत असल्याने आता शिंदे गटही आक्रमक झाला आहे. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तर थेट आदित्य ठाकरेंनाच आज फैलावर घेतलं आहे. मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपद घरातच ठेवलं ही शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी नव्हती का? शिवसेना प्रमुखांना तरी हे पटलं असतं का? छत्रपतींच्या घराण्याला तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला. उमेदवारीसाठी तुन्ही संभाजी छत्रपतींकडे करारपत्रं मागितलं. ही गद्दारी नव्हती का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बंद दाराआड दिलेला शब्द मोडणं याला काय म्हणणार? असं सवाल करतानाच गद्दारी शब्द आम्हाला वापरता, तो तुम्हाला का वापरू नये?, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला.

दीपक केसरकर यांनी आज आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. ते शिवसंपर्क मोहीम राबवत आहेत. छत्रपतींच्या नावाचा आदर केला जातो. पण इथे तर त्यांच्याकडूनच करारनामा मागितला गेल. संभाजी छत्रपती यांच्याकडून एक करारपत्रं लिहून घेण्यात आलं. त्यांच्या नावासाठी राजकारण करण्याची गरज नाही. आपण शाहू महाराजांच नाव घेतो. पण हे तर त्यांच्या नावाचा गैरवापर करत आहेत. तुम्हाला शिवसंपर्क मोहीम घ्यायचा अधिकार नाही आणि महाराजांचा नाव घेण्याचा प्रयत्न करू नये, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं.

हे सुद्धा वाचा

तुम्ही लोकशाहीचा अपमान केला

राज्याच्या भूमीशी असं करणार असाल तर तुम्ही जो शब्द वापरता तो कोणाबदल वापरला पाहिजे याचा विचार केला पाहिजे. आम्ही छत्रपतींच्या गादीशी नतमस्तक होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अख्खा महाराष्ट्र जागरूक केला. तुम्ही लोकशाहीचा अपमान करता. जनतेचा तुम्ही अपमान करत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.

बाळासाहेबांना तरी पटलं असतं का?

राज्यात जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कौल दिला नव्हता. बाळासाहेबांनी कधीही सत्तेची इच्छा बोलून दाखवली नाही. मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा कधीही मंत्री झालेला नाही. पण हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडलं. राज्यात यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं. एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्री होते. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. पण इथे तुम्हीच घरात मंत्रीपदे घेतली. हे बाळासाहेबांना तरी पटलं असतं का? असा सवाल करतानाच बाळासाहेबांच्या विचारांशी ही गद्दारीच नाही का?, असा सवाल त्यांनी केला.

राज्याची पंरपरा कुणी तोडली नव्हती

मुलं राजकारणात येतात ही राज्याची परंपरा राहिलेली आहे. मुलं राजकारणात येऊ शकतात. राज्यात स्वतःची एक परंपरा आहे आणि ती परंपरा कोणी तोडलेली नाही. आजपर्यंत मी बोलत नव्हतो. तुम्हाला गद्दार म्हणायचं नाही का?, असा सवाल त्यांनी केला.