योग, आयुर्वेदाविरोधात षडयंत्र, धार्मिक दहशतवादातून योगाची बदनामी; पत्रकार परिषदेत रामदेव बाबांचे गंभीर आरोप 

योग गुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. योगाच्या (Yoga) बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

योग, आयुर्वेदाविरोधात षडयंत्र, धार्मिक दहशतवादातून योगाची बदनामी; पत्रकार परिषदेत रामदेव बाबांचे गंभीर आरोप 
Image Credit source: TV9
| Updated on: Sep 16, 2022 | 12:43 PM

योग गुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. योगाच्या (Yoga) बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतजलीने लाखो लोकांना रोजगार दिला, मात्र आता योग, आयुर्वेद (Ayurveda) आणि स्वदेशी विरोधात षडयंत्र रचलं जातं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. योगाविरोधात उत्तराखंडमधून षडयंत्राला सुरुवात झाल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, लवकरच पतंजलीचा आयपीओ बाजारात आणणार आहे. पतंजली पाच नव्या कंपन्यांची स्थापना करणार असून, यामाध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार असल्याचंही ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले आहेत.