ठाकरेंचं भाषण, फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक- फक्त 3 शब्दात!

| Updated on: Oct 06, 2022 | 12:10 PM

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी अगदी तीनच शब्दात प्रतिक्रिया दिली.

ठाकरेंचं भाषण, फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक- फक्त 3 शब्दात!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर शिंदे गट आणि भाजप (BJP) नेत्यांकडून सणकून टीका केली जातेय. तर अनेकांनी भाषणाचीही खिल्ली उडवली आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीदेखील त्यांच्या धारदार शैलीत भाषणावर टिप्पणी केली. शिमग्यावर काय बोलायचं? अशी तीनच शब्दात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतरही पत्रकारांनी त्यांना वेगवेगळ्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया विचारली, पण त्यांनी हेच म्हटलं की सूज्ञ शिमग्यावर बोलत नसतात…

शिवसेनेच्या दोन मेळाव्यांची तुलना कशी करता, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, ‘ शिवाजी पार्कपेक्षा बीकेसी ग्राउंडची क्षमता दुप्पट आहे. काल हे ग्राउंड दुप्पट भरलं होतं…
मुंबई, एमएमआर रिजन आणि उर्वरीत महाराष्ट्रातून लोकं आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच आहे, हे प्रस्थापित करून दाखवलंय. म्हणून मी अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर विचारलं असता, शिमग्यावर प्रतिक्रिया नाही… असं वक्तव्य त्यांनी केलं.. त्यानंतरही शिंदेंची स्क्रिप्ट भाजपची होती, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय. त्यावर फडणवीसांना उत्तर विचारलं.

यावेळी फडणवीस म्हणाले, ‘ शिंदेंची स्क्रिप्ट ही भाजपची होती … असं जे म्हणतायत त्यांनी स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी वाढवायला सांगा. कारण आम्हालाही हे ऐकून कंटाळा आलाय.

विधानसभेवर भगवा फडकणारच.. पण तो खरी शिवसेना- एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातली आणि भाजपच्या युतीचा भगवा फडकणार, असा इशारा यावेळी फडणवीसांनी दिला.

पहा फडणवीस काय म्हणाले?

मूळ शिवसेनेचा विचार बाजूला सांगून उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार, आचरण स्वीकारलं, ज्यांचे मुंबईच्या बॉम्बस्फोटांशी संबंध आहेत, अशा लोकांसोबत बसणं मान्य केलं. जे सावरकरांना रोज शिव्या देतात, अशांसोबत बसतात. म्हणून त्यांच्यावर ही वेळ आलीय, असं वक्तव्यही फडणवीसांनी केलं.

कालच्या भाषणात एकनाथ शिंदेंचं एका गोष्टीसाठी फडणवीसांनी कौतुक केलं. ते म्हणाले, ‘
शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे… आम्ही काय करतोय, काय करणार हे सांगितलं. विशेष म्हणजे विकासाच्या मुद्द्याला हात घातला… पण आधीच्या दसरा मेळाव्यात फक्त पक्षप्रमुख बोलत होते, असा टोला फडणवीसांनी लगावला.