AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking News: अखेर भाजपकडून बहुमत चाचणीची मागणी, देवेंद्र फडणवीसाकडून राज्यपालांना पत्र, पुढे काय?

फडणवीस यांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केलीय. 30 तारखेला बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Breaking News: अखेर भाजपकडून बहुमत चाचणीची मागणी, देवेंद्र फडणवीसाकडून राज्यपालांना पत्र, पुढे काय?
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jun 28, 2022 | 11:46 PM
Share

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षात अखेर भाजपनं अधिकृतपणे एन्ट्री घेतलीय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत. फडणवीस यांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केलीय. 30 तारखेला बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांच्याकडून करण्यात आलीय. तसंच काही आमदारांचं पत्रही राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांना प्राप्त झालं आहे. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. त्यामुळे आता 30 जुनला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची अग्निपरीक्षा होणार असल्याचं निश्चित झालंय.

सत्तासंघर्षाचा क्लायमेक्स कसा होणार?

1.  30 जून रोजी सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशन सुरु होईल. 5 वाजेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करावा लागेल. 2. राज्यपालांनी हे पत्र सचिवांना पाठवले आहे. 3. बहुमत चाचणीवेळी होणारी भाषणे छोटी छोटी असावीत. 4. बहुमत चाचणीचे व्हिडिओ शूटिंगही करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याच दिवशी त्याचा निर्णय घेण्यात यावा. 5. सदस्यांची सुरक्षा सदनाच्या आत आणि बाहेर ठेवण्याच्या सूचना

सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्या – फडणवीस

राज्यपालांना आज भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताची परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही. अशावेळी ठाकरे सरकारकडे बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे बहुमत चाचणीची मागणी आम्ही राज्यपालांकडे केलीय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे.

सरकार अल्पमतात- भाजप

हे सरकार अलपमतात असल्याचे पत्र फडणवीस आणि काही अपक्षांनी दिलेले आहे. ते पत्र काळजीपूर्वक पाहून, आणि सध्या राज्यात माध्यमांकडून जे कव्हरेज होते आहे, ते पाहिले आहे. ते पाहून असे दिसते आहे की उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्यांचे बहुमत गमावलेले दिसते आहे. त्यामुळे आता याचा निर्णय करण्यासाठी 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलवण्याचे पत्रात सांगण्यात आले आहे. त्या दिवशी सरकारने बहुमत सिद्ध करावे असे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपा अखेरीस मैदानात

राज्यात आता सत्तास्थापनेचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. शिवसेनेचे सुमारे ३० आणि १० अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असताना, आता सरकार अल्पमतात आले असल्याचे मानण्यात येते आहे. आत्तापर्यंत या बंडापासून अंतर ठेवून असलेले भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता यात सक्रिय झाल्याचे दिसते आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर, ते मुंबईत परतले. त्यानंतर भाजपाचे नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्यसह इतर अनेक नेते त्यांच्या सागर या निवासस्थानी आले. त्यानंतर फडणवीस आणि सर्व नेते हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले आहेत. या भेटीतून फडणवीसांनी राज्यातील सरकार अल्पमतात आल्याचे सांगून राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?