ते स्वत:ला छत्रपती समजतात काय?, राणेंवरील पोलीस कारवाईच्या चर्चेवर फडणवीसांचा सवाल

| Updated on: Aug 24, 2021 | 1:44 PM

भाजप नेते नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, अशी भाषा पोलीस आयुक्त वापरत आहेत. (devendra fadnavis)

ते स्वत:ला छत्रपती समजतात काय?, राणेंवरील पोलीस कारवाईच्या चर्चेवर फडणवीसांचा सवाल
devendra fadnavis
Follow us on

मुंबई: भाजप नेते नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, अशी भाषा पोलीस आयुक्त वापरत आहेत. कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना हा अधिकार दिला आहे?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (devendra fadnavis ask question to police commissioner over notice to rane)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीसह पोलिसांनाही सवाल केले. नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजतात का? मी आयुक्तांची नोटीस वाचली. त्यात, जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, असे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना हा अधिकार दिला आहे, असा सवाल करतानाच तुम्ही जे सेक्शन लावले त्याबाबत पहिली त्यांची जबानी घ्यावी लागेल. त्यांची बाजू ऐकावी लागेल नंतरच कारवाई करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

आम्ही राणेंच्या पाठिशी

मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीबाबत बोलणं कोणत्याही चुकीच्या विधानाचं समर्थन केलं जाणार नाही. आम्ही नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही. पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दगडफेक उद्धवजींच्या आदेशाने?

आमच्या कार्यालयावर दगडफेक केली तर खबरदार. आम्ही हे खपवून घेणार नाही. दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही. शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज कसं म्हणता?

तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता, मंत्र्यांना लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर है म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? आमच्या कुटुंबा विरोधात, पत्नी विरोधात तुम्ही काय काय म्हणता त्यावर कारवाई होत नाही, ही दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही थांबणार नाही

अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. पोलिसांच्या भरवश्यावर भाजपला रोखण्याचा प्रयत्न गेल्या 50 वर्षापासून होत आहे. पण आम्ही थांबणारे नाही, थांबणार नाही, कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आमची वाटचाल सुरूच राहील, असं ते म्हणाले. (devendra fadnavis ask question to police commissioner over notice to rane)

 

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे काय?; जयंत पाटलांचा पाटील, फडणवीसांना सवाल

(devendra fadnavis ask question to police commissioner over notice to rane)