उद्धव ठाकरेही गारद का? एक शरद बाकी गारद नव्हे, तर एक नारद बाकी गारद : देवेंद्र फडणवीस

'सामना' हे शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली.

उद्धव ठाकरेही गारद का? एक शरद बाकी गारद नव्हे, तर एक नारद बाकी गारद : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 09, 2020 | 12:55 PM

नाशिक : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल द्यायला हवं होतं, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ‘बाकी सर्व गारद असतील, तर उद्धव ठाकरेही गारद आहेत का?’ असा बोचरा सवाल फडणवीसांनी विचारला. सलग दुसऱ्या दिवशी भाजप-शिवसेना यांच्यात ‘सामना’ सुरुच आहे. (Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Sanjay Raut)

‘सामना’ किती जण वाचतात? माध्यमांना आयती बातमी मिळते, म्हणून ‘सामना’ला तुम्ही प्रसिद्धी देता. ‘सामना’मध्ये कोरोनाबाबत एकही अग्रलेख नाही.’ असे फडणवीस म्हणाले. नाशिक दौऱ्यात ते ‘टीव्ही9 मराठी’शी बोलत होते.

‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असं टायटल मुलाखतीला द्यायला हवं होतं, असं म्हणत ‘सामना’ हे शिवसेनेचे नाही, तर तीन पक्षांचे मुखपत्र असल्याची खोचक टीका फडणवीसांनी केली. बदल्यांचे आणि फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कोरोनावर लक्ष द्या, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा : ‘सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने, कधी राज्यपालांच्या : देवेंद्र फडणवीस

“राज्यात मास टेस्टिंग महत्वाचे आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी नंबर गेम खेळण्यात व्यस्त आहे. आकडे कमी दाखवण्यासाठी मुंबईकरांना सरकार अडचणीत आणत आहे” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सरकारने अग्रेसिव्ह टेस्ट मोफत करणं गरजेचं आहे मुंबईचा इन्फेक्शन रेशो देशात सर्वाधिक आहे. खाजगी हॉस्पिटल सरकारच्या जीआरचा गैरफायदा घेत लूट करत आहेत, असा दावा त्यांनी केला. खाजगी शाळांनी फी वाढवणे चुकीचे आहे. सध्या तरी ऑनलाइन शिक्षण देऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

‘सामना’ची भूमिका रोज बदलते, ती कधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात असते, कधी बाजूने असते. कधी राज्यपालांच्या बाजूने असते, तर कधी विरोधात असते. त्यांना स्वतःचा बेसच नाही. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या ‘सामना’ची काय अवस्था आहे. भूमिका नसलेला सामना, लांगुलचालन करणारा सामना, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी काल केला होता.

पहा व्हिडिओ :

(Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Sanjay Raut)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.