देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा ‘वर्षा’वर, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण

त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक तास चर्चाही झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अधिक चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा वर्षावर, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण
देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा 'वर्षा'वर, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 26, 2022 | 9:26 AM

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल रात्री उशिरा वर्षावर दाखल झाले. दिवाळीनिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) आणि महामंडळांच्या नियुक्तीवर चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे रात्री 11 च्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. याप्रसंगी फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कारही केला. यावेळी वर्षावर खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या.

त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक तास चर्चाही झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अधिक चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत महामंडळांवरील नियुक्त्यांवरही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल गडचिरोलीत होते. नागपूर विमानतळावर आल्यावर त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत विचारण्यात आले होते. त्यावर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच विदर्भासहीत सर्वांना या विस्तारात संधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराववरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे.

साधारणपणे हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतं. दरम्यान, महामंडळांवरील नियुक्तीसाठी राज्य सरकारने सहा जणांची एक समिती स्थापन केली आहे. या समितीत शिंदे गटाचे तीन तर भाजपचे तीन सदस्य आहेत.