ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस

| Updated on: Dec 18, 2020 | 11:41 AM

बुलेट स्टेशन जमिनीखाली नेल्यास खर्च पाच-सहा हजार कोटींवर जाईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली Devendra Fadnavis Metro Car Shed

ठाकरे सरकारचे सल्लागार कोण समजत नाही, महाराष्ट्र बुडवायला निघालेत : फडणवीस
Follow us on

नागपूर : राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडची (Metro Car shed) जागा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला (BKC) हलवण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस नागपुरात बोलत होते.

…तर बुलेट स्टेशनचा खर्च सहा हजार कोटींवर

बुलेट ट्रेन स्टेशनची जागा सरकार मेट्रो कारशेडसाठी घेण्याचा निर्णय हास्यास्पद आहे. त्याची अधिकृत घोषणा झाली का, माहिती नाही, परंतु हा पोरखेळ चालवला आहे. बीकेसीची जागा ही प्राईज लँड आहे. 1800 कोटी रुपये प्रतिहेक्टर खर्च आला. त्यामुळे 25 हेक्टर जागेसाठी 25 ते 30 हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. बुलेट ट्रेनच्या स्टेशनची रचना जमिनीच्या तीन लेव्हल खाली करण्यात आली आहे. तर जमिनीवर केवळ पाचशे मीटर जागा व्यापली जाईल. आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राच्या इमारती जमिनीवर असतील. मात्र बुलेट स्टेशन जर आता खाली नेलं तर सध्याचा पाचशे कोटींचा खर्च पाच ते सहा हजार कोटींवर जाईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली.

“मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र”

राज्य सरकारला अतिरिक्त भुर्दंड तर पडेलच, पण वार्षिक देखभाल-दुरुस्ती खर्च पाच-सहापट अधिक होईल. हे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला. राज्य सरकारचे सल्लागार कोण आहेत, हे समजत नाही, जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे आणि या सरकारलाही. महाराष्ट्राचं नुकसान केलं जात असून अशाप्रकारे प्रोजेक्ट अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणं चुकीचं असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“कोर्टावर खापर फोडणं अवमानकारक”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायव्यवस्थेवर केलेल्या आरोपावर फडणवीसांनी टीका केली. सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखवल्यावर न्यायव्यवस्थेला दोष द्यायचा, हे न्यायालयाचा अवमान करणारे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातम्या :

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा; देवेंद्र फडणवीसांचा सल्ला

हे पाकिस्तान नाही, हा महाराष्ट्र आहे, इथे कायद्याचं राज्य, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

(Devendra Fadnavis on Thackeray Govt over Metro Car Shed)