Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या कारकिर्दीची चिरफाड ते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा, वाचा सविस्तर…

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे

Devendra Fadnavis : ठाकरे सरकारच्या कारकिर्दीची चिरफाड ते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 5:16 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील 10 दिवसांचं सत्तानाट्य आज अखेर एका नव्या वळणावर येत वेगळा अंक सुरू करतंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील. याची घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलीय. अवघा देश डोळे लावून बसलेल्या पत्रकार परिषदेत सगळ्यात मोठा मास्टरस्ट्रोक देवेंद्र फडणवीस यांनी टाकला ज्यामुळे सगळ्यांचं भूवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अन् तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण तो साफ खोटा ठरवत त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची पुढे केली अन् सरकारला आपला बाहेरून पाठिंबा असेल असं फडणवीसांनी जाहीर केलं. आणखी कोणत्या मुद्द्यांवर फडणवीस बोलले? पाहुयात…

1. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलीय. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील आणि आज संध्याकाळी त्यांचा एकट्याचाच शपथविधी होईल अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिलीय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आज राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सरकार चालेल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. तसंत शिंदे यांचा आज संध्याकाळीच शपथविधी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

2. आमचा बाहेरून पाठिंबा

शिंदे सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा असेल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. “मी बाहेर असेल. पण सरकार चालेलही माझी जबाबदारी असेल. या सरकारला मी साथ आणि समर्थन देणार. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळसााहेबांनी मांडलेलं हिंदुत्व. भाजप हिंदुत्व मांडतय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार. शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि 16 अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्हाी राज्यपालांना दिलं. आण्ही सत्तेच्या पाठिमाग नाही. मुखय्मंत्रीपदासाठी आण्ही चालत नाही.ही तत्तवाची लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचाराची लढाई. आम्ही शिंदेंना भाजप पाठिंबा देईल आणि शिंदे मुख्यमंत्री होतील. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल. नंतर आम्ही विस्तार करू. त्यात शिवसेनेचे शिंदेंसोबत असलेलेल भाजपचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील”, असं फडणवीस म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

3. मविआच्या कामांची चिरफाड

“आघाडीने विकासाची कामे केली नाही. भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचारात जेलमध्ये जाणं ही आश्चर्याची आणि खेदजनक बाब होती. एकीकडे बाळासाहेबांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंधित मंत्री तुरुंगात जातो त्याला मंत्रीपदावरून काढलं नाही. रोज सावरकर हिंदुत्वाचा अपमान. ठिक आहे. शेवटच्या दिवशी संभाजी नगर झालं. पण कधी. राज्यपालांचं पत्रं आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर धाराशीव दिबा पाटील हे निर्णय घेतले. अर्थात हे निर्मय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ”, असं म्हणत देवेंद्र यांनी मविआ सरकारच्या कामाचा आढावा घेतला.

4. 2019 च्या निवडणुकीचा

“आपल्या सर्वांना कल्पना आहे. २०१९च्या निवडणुकीत भाजप आणि सेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजप १०५ जागा जिंकली. शिवसेना ५६ जागा जिंकली. अशा १६१ जागा आणि अपक्ष मिळून १७० लोकं निवडून आले होते. सहाजिकच अपेक्षा होती की भाजप सेनेच्या युतीचं सरकार येईल. त्यावेळी मोदींनी सर्वांच्या उपस्थित भाजपचा मुखय्मंत्री बनेल अशी घोषणा केली होती. पण दुर्रेवाने निवडमुकीचे निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्रं शिवसेना नेत्याने यांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला आणि ज्यांनी हिंदुत्वाचा विरोध केला. सावरकरांचा विरोध केला अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली. अन् भाजपला बाहेर ठेलं हा मॅनडेटचा अपमान होता. लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं नवह्तं. ते युतीला होतं. पण जनतेच्या कौलाचा अपमान केला”, असं म्हणत फडणवीसांनी त्यांच्या मनातील सल बोलून दाखवली.

5. शिवसेनेची कुंचंबना

“शिवसेनेच्या आमदारांची कुचंबना झाली. शिंदे हे शिवसेनेचे नेते. आमच्या मतदारसंघात हारलेल्या विरोधकांना निधी दिला जात असेल तर कशाच्या भरवश्यावर लढायचं असा विषय झाल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला. की युती तोडायची. ज्या युती सोबत निवडून आलो. ती आघाडी तोडा. त्यासोबत राहायला तयार नाही, दुर्देवाने उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना अधिक प्राधान्य दिले. त्यांचीच शेवटपर्यंत कास धरली. हा त्यांचा प्रश्न. त्यावर बोलणार नाही. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज आहे. सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सराकर देऊ लोकांच्या डोक्यावर निवडणुका लादणार नाही. असं मी वारंवार सांगत होतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.