Devendra Fadnavis : ‘…त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…!’ देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

| Updated on: Jun 09, 2022 | 12:12 AM

भाजपचा आक्रोश पाण्यासाठी नाही तर सत्ता गेली म्हणून होता, असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. आता देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. इतकंच नाही फणडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काही सवालही केले आहेत.

Devendra Fadnavis : ...त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि...! देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पाणी प्रश्न, औरंगाबादचं (Aurangabad) नामांतर, बाबरी मशिद, हिंदुत्व, महागाई, अशा अनेक मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसंच औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात भाजपनं काढल्ल्या जलआक्रोश मोर्चाची खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी उडवली. भाजपचा आक्रोश पाण्यासाठी नाही तर सत्ता गेली म्हणून होता, असा टोला ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. आता देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. इतकंच नाही फणडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काही सवालही केले आहेत.

‘बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि…! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना… काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे !’ अशा शब्दात फडणवीस यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या जलआक्रोशाची  मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं औरंगाबादेत काढलेल्या जलआक्रोश मोर्चावर जोरदार टीका केली. ‘मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला. तो आक्रोश त्यांचा सत्ता गेली होती म्हणून होता पाण्यासाठी नव्हता. मागचे पाच वर्षे तुम्हीच होता. आम्ही फक्त त्यांच्यासोबत होतो. खोटं बोलणं हे आम्हाला शिकवलेलं नाही. रस्त्यासाठी आम्ही निधी दिला आहे. तीन चार वर्षापूर्वी संभाजीनगरचे रस्ते कसे होते. अजूनही पूर्ण काम झालेलं नाही. पण सुधारणा होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केला. अगदी मेट्रोची गरज लागली तर त्यासाठी प्लान बनवण्याची सुरुवात केली आहे. मेट्रो शहराची विद्रुपीकरण करणारी नसेल. विध्वंसक विकासकाम आम्ही केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. संभाजीनगरची शान जाईल असं मी काही करणार नाही’, असं ठाकरे म्हणाले.