‘बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव’, फडणवीसांचा घणाघात

| Updated on: Sep 08, 2021 | 3:09 PM

एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप व्यक्त केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

बेळगावात मराठी माणसाचा नाही तर संजय राऊतांच्या अहंकाराचा पराभव, फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र फडणवीस, संजय राऊत
Follow us on

नागपूर : बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा संताप व्यक्त केलाय. राऊतांच्या या टीकेला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis responds to MP Sanjay Raut’s criticism)

बेळगावमध्ये मराठी माणसाचा पराभव झालेला नाही. तर बेळगावात खासदार संजय राऊत यांच्या अहंकाराचा पराभव झालाय, अशा शब्दात फडणवीस यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मराठी माणसाचा पराभव कुणीही करु शकत नाही. भाजपच्या नगरसेवकांमध्ये 15 पेक्षा अधिक मराठी नगरसेवक आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव झाला म्हणून मराठी माणसाचा पराभव होत नाही. मराठी माणसाचा पराभव होऊच शकत नाही, असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी राऊतांना दिलंय.

खासदार संजय राऊतांचा संताप

बेळगाव महापालिका निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला होता. बेळगाव महाराष्ट्रात येण्यासाठी शेकडो मराठी माणसं मेली. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला. राजकारण बाजूला ठेवा. जल्लोष करताना आणि पेढे वाटताना मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला.

‘काय गडबड केली ते समजेलच’

मराठी माणूस महापालिकेत सत्ता स्थापन करेल अशी खात्री होती. बेळगावमध्ये सातत्याने मराठी माणूसच निवडून आला आहे. एकीकरण समितीला केवळ तीनच जागा मिळाल्याची माहिती आहे. हे दुर्देव आहे. पण यामागे किती मोठं कारस्थान झालं असेल याची कल्पना करवत नाही. मी ईव्हीएमवर याचं खापर फोडणार नाही.कर्नाटकाच्या सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून बेळगावर मराठी माणसाचा हक्क राहू नये यासाठी काय गडबड केली त्याची माहिती बाहेर येईलच, असंही राऊत म्हणाले होते.

मुंबई अभी बाकी है – चंद्रकांत पाटील

सोशल मीडियावर भाजपकडून ट्रेंड केलं जात आहे की बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, याबाबत पाटील यांना विचारलं असता, ‘बेळगाव झांकी आहे की नाही माहिती नाही, पण मुंबई बाकी आहे’ हे तर नक्कीच आहे आणि ती सोडणार नाहीत. हैदराबादच्या वेळेलाही आम्ही म्हटलं होतं. दोन का एक नगरसेवकावरुन थेट आम्ही 51 वर गेलो. तेव्हा आम्ही म्हणलं की ज्या स्टाईलने आम्ही हैदराबाद लढलो, त्याच स्टाईलने मुंबई लढणार, असं थेट आव्हानच पाटील यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसंच बेळगावात भाजपचे जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यात निम्म्यापेक्षा जास्त मराठी भाषिकच असल्याचं पाटील यांनी आवर्जुन सांगितलं.

इतर बातम्या :

Goa Election 2022 : मागच्या वेळेस गडकरी, ह्या वेळेस फडणवीस, गोव्यात ‘कमाल’ करणार? भाजपचा मास्टरप्लॅन काय?

राणे-ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये ‘पॉलिटिकल हिट?’

Devendra Fadnavis responds to MP Sanjay Raut’s criticism