भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच!, कांगावा न करता काँग्रेसने चौकशीला सामोरं जावं- देवेंद्र फडणवीस

नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी झाली. तब्बल सव्वा तीन तास ही चौकशी झाली. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय.

भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होणारच!, कांगावा न करता काँग्रेसने चौकशीला सामोरं जावं- देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Jun 13, 2022 | 3:53 PM

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची आज ईडीकडून चौकशी झाली. सव्वा तीन तास त्यांची चौकशी झाली. देशभर काँग्रेसकडूम आंदोलनं करण्यात आली. त्यावर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केलंय. “मला वाटतं एजीएल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती कुणी खासगी संपत्ती करत असेल तर यावर कारवाई होणं स्वाभाविक आहे. मला वाटतं काँग्रेसनं (Congress) याचा बाऊ करण्यापेक्षा या चौकशीला सामोरं जायला हवं”,असं फडणवीस म्हणाले आहेत.

“आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी झाली. त्या चौकशीचं निमित्त करुन मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं विविध शहरात जनतेला वेठीला धरण्याचं काम केलं. खरं तर ही चौकशी न्यायालयाच्या निर्णयानंतर झालीय. एजीएल ही कंपनी 1930 साली स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांनी तयार केली होती. स्वातंत्र्य संग्रामाचं एक मुखपत्र असावं यासाठी 5 हजार स्वातंत्र्य सैनिक या कंपनीचे मालक होते. 2010 साली राहुल गांधी आणि त्यांच्या परिवारानं एक यंग इंडियन नावाची कंपनी तयार करु, केवळ पाच लाखाची कंपनी तयारी केली आणि एजीएलचे सर्व शेअर या कंपनीच्या नावे ट्रान्सफर केले आणि एजीएलच्या 2 हजार शेअरवर आपली मालकी प्रस्थापित केली. याबाबत दिल्ली हाय कोर्टात ज्यावेळी विषय गेला तेव्हा कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. त्यानंतर ईडीने कारवाई सुरु केली. पुरावे मिळाल्यानंतर अशा प्रकारची चौकशी सुरु केली आहे. आता काँग्रेसकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जातोय तो चुकीचा आहे”, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांची ईडी चौकशी

नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी झाली. तब्बल सव्वा तीन तास ही चौकशी झाली. देशभर काँग्रेसच्या वतीने आंदोलनं करण्यात आली.