भाजपमध्ये बबन्याचा बबनराव झाला, आष्टीचं बेणंही गेलं, धनंजय मुंडेंची सडकून टीका

| Updated on: Sep 18, 2019 | 2:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde Beed Speech) यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली.

भाजपमध्ये बबन्याचा बबनराव झाला, आष्टीचं बेणंही गेलं, धनंजय मुंडेंची सडकून टीका
Follow us on

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde Beed Speech) यांनी होमग्राऊंड बीडमध्ये तुफान फटकेबाजी केली. सत्ताधारी भाजप-शिवसेनेसोबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेनेकडून मंत्रिपद मिळवलेले जयदत्त क्षीरसागर आणि उदयनराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली.

“जे कावळे होते ते गेले. मात्र पवारसाहेब तुमच्यावर प्रेम करणारे मावळे सोबत आहेत. छत्रपती उदयनराजे गेल्यानंतर धक्का बसला. छत्रपती पंताला शरण गेले”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर सडकून टीका केली.

शरद पवारांनी जेवढे विमानतळ बांधले तेवढे बसस्थानक गुजरात मध्ये नाहीत, असं म्हणत त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना टार्गेट केलं.

‘मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बनबराव म्हणतात’

“शरद पवार साहेबांनी प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांच्यासह अन्य मागासवर्गीय नेत्यांना खुल्या जागेतून आमदार- खासदार केलं. भाजपचं आता विभाजन झाले आहे. ज्या बबनराव पाचपुते यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले, त्यांनाच भाजपात घेऊन पवित्र केलं. मुख्यमंत्री आधी बबन्या म्हणायचे, आता बबनराव पाचपुते असं नाव घेतात”, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली.

पिचडांवर टीकास्त्र

मधुकर पिछड यांच्या दुसऱ्या पत्नी आदिवासी नाहीत, ज्यांनी बोगस आदिवासीचं प्रमाणपत्र काढून 1500 कोटीचा भ्रष्टाचार केला, असा घणाघात धनंजय मुंडेंनी केला.

‘आष्टीचं बेणं भाजपात’

विनायक मेटे महजनादेश यात्रेच्या बसवर चढले आणि खेळ झाला.  मंत्री रुसून गेल्या, असं म्हणत त्यांनी  पंकजा मुंडेंवर टीका केली.

जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत गेले. इथे रोजगार नव्हता म्हणून ते गेले. आष्टीचं बेणं भाजपात गेलं, असं म्हणत त्यांनी भाजप आमदार  सुरेश धस यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

बीडमधील सहाच्या सहा विधानसभा निवडणुकीत विजयाचं वचन घ्या, हीच उतराई असेल, असं आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी केलं.