धनंजय मुंडे यांच्या एका निर्णयाने विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी मिळणार मोठी मदत!

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या नव्या निर्णयाने शिष्यवृत्ती योजनेचा कोटा 2003-04 नंतर प्रथमच 100% पूर्ण झाला आहे. (Dhananjay Munde decision will help students to study abroad)

धनंजय मुंडे यांच्या एका निर्णयाने विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणासाठी मिळणार मोठी मदत!
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री

मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात मागील आठवड्यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अंशतः बदल केले होते. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेचा कोटा 2003-04 नंतर प्रथमच 100% पूर्ण झाला आहे. (Dhananjay Munde decision will help students to study abroad)

धनंजय मुंडे यांनी काय निर्णय घेतला?

अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे संधी देण्यात येईल असा निर्णय धनंजय मुंडे यांनी घेतला होता.

धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना फायदा

दरवर्षी 75 विद्यार्याथ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. 2020-2021 या शैक्षणिक वर्षात परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी निवड समितीने अंतिम निवड केलेल्या 75 पैकी 9 विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा लाभ नाकारल्याने 9 जागा रिक्त झाल्या होत्या. मात्र धनंजय मुंडे यांनी केलेल्या नव्या निर्णयामुळे या ९ जागी प्रतीक्षा यादीतील 9 विद्यार्थ्यांची गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, यामुळे सन 20003 -04 नंतर प्रथमच या योजनेतील लाभार्थींचा कोटा 100% पूर्ण झाला आहे.

रिक्त जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारास संधी

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी चे शिक्षण घेणाऱ्या जागतिक क्रमवारीतील 300 पैकी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवलेल्या 75 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्यात येतो. जुन्या नियमानुसार अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्याने काही कारणास्तव ऐनवेळी लाभ नाकारला तर ती जागा रिक्त राहत असे, या रिक्त जागी प्रतीक्षा यादीतील उमेदवारास संधी देण्यात यावी याबाबतचा निर्णय धनंजय मुंडे यांनी नुकताच जाहीर केला होता.

दरम्यान प्रतीक्षा यादीतील 9 उमेदवारांना या योजनेतील नव्या नियमामुळे आता शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आले असून, यासाठी या विद्यार्थ्यांनी ना. धनंजय मुंडे व सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले आहेत. तर धनंजय मुंडे यांनी देखील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

(Dhananjay Munde decision will help students to study abroad)

हे ही वाचा :

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ; वैभव नाईक गरजले

शरद पवारांनी काँग्रेसचा ‘तो’ प्रस्ताव नाकारला; पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या मदतीला जाणार?

Published On - 12:14 pm, Thu, 25 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI