अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला

| Updated on: Jan 13, 2021 | 5:06 PM

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली.

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला
संग्रहित फोटो
Follow us on

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका गायक तरुणीने बलात्काराचे आरोप केल्याने धनंजय मुंडे संकटात सापडले आहेत (Dnananjay Munde Rape Case). अशातच त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांची आज (बुधवार) सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली आहे. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू झालं. (Dhananjay Munde meet Sharad pawar)

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर किंबहुना खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली.

रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. तसंच पोलिस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅखमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांच्या बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलेही आहेत, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

आज पवार यांना भेटून हेच स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलेलं असावं. कारण बुधावारी त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये माझ्या जवळच्या लोकांना आमचे संबंध माहिती आहेत तसंच कुटुंबाला देखील हे सगळं प्रकरण माहिती आहे, असं म्हटलं होतं. साहजिकच पक्षातील जवळच्या लोकांना धनंजय मुंडेंचं हे प्रकरण माहिती असावं, अशी अटकळ आता बांधली जात आहे.

धनंजय मुंडे यांनी पवारांची भेट घेतल्यावर पवारांनी त्यांना नेमका काय सल्ला दिला? किंवा धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणावर आता शरद पवार काय बोलणार? काय निर्णय घेणार, याची प्रतिक्षा आता राज्याला लागली आहे.

धनंजय मुंडे यांनी घेतली अजितदादा, भुजबळांची भेट

तत्पूर्वी, धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्ममंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीला धनंजय मुंडेही उपस्थित होते. मुंडे यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आहे.

(Dhananjay Munde meet Sharad pawar)

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा; चंद्रकांत पाटलांची मागणी

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य