नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कारांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis on Dhananjay Munde )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:51 PM, 13 Jan 2021

नाशिक : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर काल (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे (Devendra Fadnavis on Dhananjay Munde ). नाशिकमध्ये जेष्ठ स्वयंसेवक नाना नवले यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर आपल्या संबंधांची कबुली दिली आहे. नैतिकतेच्या आधारावर त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भात विचार करण्याती आवश्यकता आहे. त्यातील जी कायदेशीर बाब आहे, धनंजय मुंडे आणि तक्रारदार तरुणी दोघांनी मांडली आहे, धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी कोर्टात गेल्याचं सांगितलं आहे. असं संशयाचं वातावरणं राहणं योग्य नाही. त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या संदरंभातील सत्य बाहेर आणावं. पोलिसांनी एकदा सत्य बाहेर आलं की, आम्ही आमची मागणी करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘काही नेते भाजपच्या वाटेवर’

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांवरही प्रतिक्रिया दिली. “जे दुसऱ्या पक्षात गेले त्याचं वाईट वाटणार नाही. अजूनही काही नेते भाजपमध्ये येण्याच्या वाटेवर आहे”, असा दावा फडणवीस यांनी केला. “2014 मध्ये सत्ता नसताना आमची सत्ता आली. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विस्तार होतच असतो”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

‘औरंगाबादचं नामांतर हे तर डुप्लिकेट काम’

यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचं संभाजीनगर केलंय. खरे तर त्यांच्याकडे अधिकार आहे. ते अधिकार पदावर आहेत. त्यांनी ट्विटरवर असं काही टाकण्यापेक्षा प्रस्ताव मंजूर करून निर्णय घ्यावा. हे म्हणजे डूप्लिकेट काम झालं, असा चिमटा काढतानाच औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेची मिलीजुली कुस्ती सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या :

‘सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही’, धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटलांची भूमिका

संबंधित व्हिडीओ  :