विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती

| Updated on: Nov 29, 2019 | 5:42 PM

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती (Dilip Walse Patil protem speaker) केली आहे.

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती (Dilip Walse Patil protem speaker) केली आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली (Dilip Walse Patil protem speaker) होती. मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार स्विकारताच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी महाविकासआघाडीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केली (Dilip Walse Patil protem speaker) आहे.

महाराष्ट्रात नव्या महाविकासआघाडी सरकारला येत्या 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे उद्याच (29 नोव्हेंबर) ही बहुमत चाचणी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान उद्या सकाळी विधानसभेत कामाकाजाला सुरुवात होणार आहे. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांची हंगामी अध्यक्षपदी नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

यानंतर मंत्र्यांचा परिचय होणार आहे. तर विरोधी पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती होईल. यानंतर बहुमत चाचणी होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अर्थात महाविकासआघाडी विश्वासदर्शक ठरावाला (Dilip Walse Patil protem speaker) सामोरे जातील.

दरम्यान राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर 26 नोव्हेंबरला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली होती. मात्र बहुमत नसल्याने फडणवीस यांनी राजीनामा (Dilip Walse Patil protem speaker) दिला.

कोण आहेत दिलीप वळसे पाटील? 

  • दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असून त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे.
  • दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली आंबेगाव तालुक्‍यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे-पाटील यांचा उदय झाला. वडील दत्तात्रेय गोविंदराव वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणाची सुरुवात केली.
  • दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग  सातव्यांदा आमदार झाले आहेत.
  • 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
  • युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला. वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण  विभाग, ऊर्जा विभागासारखे महत्त्वाचे खाते त्यांनी सांभाळले आहेत.