मराठा मोर्चा आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची चर्चा

| Updated on: Oct 14, 2022 | 12:16 AM

ऑडिओ क्लिपमधील संभाषणात चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख

मराठा मोर्चा आणि व्हायरल ऑडिओ क्लिपची चर्चा
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षण आणि त्यानिमित्त झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. दोन मराठा मोर्चाशी निगडीत लोकांचं हे संभाषण आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात चंद्रकांतदादांचा उल्लेख आल्यामुळे त्यावरुन आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत.

आरक्षणासाठी सुरु झालेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलनासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय….. दाव्यानुसार फोन संभाषण ज्यांच्यात झालं आहे. ते दोन्ही जण मराठा मोर्चाशी निगडीत आहेत.

या दोघांच्या संभाषणात मराठा मोर्चे, आंदोलनं, आर्थिक व्यवहाराचा संवाद झालाय. एकूण 27 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक राजकीय नेत्यांचीही नावांचा उल्लेख आहे.

संभाषण करणारे दोघं जण चंद्रकांत दादा असा एक उल्लेख करतात. त्यापुढे पैशांच्या व्यवहाराचा विषय येतो. त्यावरुन इतर मराठा मोर्चा सन्मवयकांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले आहेत. तर, चंद्रकांत पाटलांनी हे आरोप फेटाळून लावलेत.

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप नेमकी कधीची आहे. पैशांचा व्यवहाराचा जो संवाद झालाय. तो नेमका कशासाठी होता. असे अनेक मुद्दे संभाषणातून पूर्णपणे स्पष्ट होत नाहीत.

काही मराठा मोर्चा समन्वयकांनी या क्लिपला खोटं ठरवलंय. तर, काही जण या क्लिपची चौकशी करण्याची मागणी करत आहेत.