जयकुमार रावलांबद्दल नाराजी, संकटमोचकावर जबाबदारी, नाशिक जिंकण्यासाठी गिरीश महाजनांना धुरा

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर गिरीष महाजन यांना जबाबदारी मिळाल्यानंतर तिथं होणार नगरसेवकांचं बंड तसेच पक्षांतर थांबण्याच काम गिरीष महाजन यांना करावं लागणार आहे.

जयकुमार रावलांबद्दल नाराजी, संकटमोचकावर जबाबदारी, नाशिक जिंकण्यासाठी गिरीश महाजनांना धुरा
गिरीष महाजन
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Feb 26, 2022 | 12:32 PM

नाशिक – महापालिका निवडणुकीची ‘संकटमोचक’ गिरीश महाजनांवर (girish mahajan) जबाबदारी भाजपाच्या (bjp) नेतृत्वाकडून देण्यात आल्याने नाशिकमध्ये आता गिरीश महाजनांचा राजकीय करिश्मा पाहायला मिळणार आहे. भाजपाची नुकतीच मुंबईत (mumbai) एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये गिरीश महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. भाजपाच्या प्रभारी असलेल्या जयकुमार रावल यांच्यावर पक्षात नाराजी असल्याने गिरीष महाजनांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. परवा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली त्यामुळे नाशिकमधील महापालिकेची निवडणुक अत्यंत चुरशीची ठरेल असं वाटतंय. नाशिकमध्ये संजय राऊत आणि गिरीष महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागणार अशी देखील राजकीय गोठात चर्चा आहे.

पक्षातील फुट टाळण्यासाठी निर्णय

नाशिक महापालिकेची निवडणुक अत्यंत महत्त्वाची असल्याने तिथं आतापासून अनेक पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. त्यामुळे तिथं महत्त्वाच्या व्यक्तीच्या हातात सुत्र असावीत असं प्रत्येक पक्षाला वाटतंय. भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद असल्याचे कानावर आल्याने पक्ष श्रेष्ठींनी मला पालिकेची माळ गिरीष महाजन यांच्या गळ्यात घातली आहे. त्यामुळे पक्षात फुट पडणार नाही याची काळजी देखील घेतली आहे. भाजपाच्या प्रभारी असलेल्या जयकुमार रावल यांच्यावर पक्षात नाराजी असल्याचे पक्ष श्रेष्ठींच्या कानावर आले होते. त्यामुळे तिथं होणा-या निवडणुकीच्या तोंडावर पक्षात फुट पडणार याची काळजी गिरीष महाजन यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

संजय राऊत आणि गिरीष महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागणार

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर गिरीष महाजन यांना जबाबदारी मिळाल्यानंतर तिथं होणार नगरसेवकांचं बंड तसेच पक्षांतर थांबण्याच काम गिरीष महाजन यांना करावं लागणार आहे. त्यामुळे तिथं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल अशी चर्चा आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून संजय राऊत हे जबाबदारी संभाळतील असं ऐकायला मिळत आहे. समजा तिथं गिरीष महाजन आणि संजय राऊत निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर तिथली निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुध्दा तिथल्या अनेक पदाधिका-यांना मुंबईतला बैठकीत दम दिला आहे. ते म्हणतात की, ज्यांना सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं, पण गेल्यानंतर परिणाम सुध्दा भोगावे असं सज्जड दम त्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना दिला आहे.

Chanakya Niti : घरामध्ये आर्थिक संकट कधीच पहायचे नसेल तर पैशाशी संबंधित ‘या’ 5 गोष्टी कधीही विसरू नका!

पिंपरीतील लॉजवर वेश्या व्यवसाय, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघींची देह व्यापाराच्या दलदलीतून सुटका

प्रेम विवाहानंतरही बायकोचं एक्स-बॉयफ्रेण्डशी लफडं सुरु, चिडलेल्या नवऱ्याकडून जन्माची अद्दल