अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का? फडणवीस म्हणतात….

| Updated on: Jun 29, 2020 | 5:56 PM

आज विदर्भ दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. (Devendra Fadnavis talks on Ajit Pawar)

अजित पवार भेटतात का? ते नाराज आहेत का? फडणवीस म्हणतात....
Follow us on

अकोला : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी इनसाईडरच्या मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटानंतर, राजकीय वातावरणात अजूनही अनेक अंदाज बांधले जात आहेत. सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीने थेट ऑफर दिली होती मात्र पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. तसंच अजित पवारांसोबतच्या शपथविधीबाबतही फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आज विदर्भ दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अजित पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. (Devendra Fadnavis talks on Ajit Pawar)

अजित पवार नाराज आहेत अशी चर्चा आहे, ते तुम्हाला आता भेटतात का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “अजित पवार सध्या राजी की नाराजी? याबाबत शरद पवारच सांगू शकतील, मी काय सांगू?”

वाचा :  आयुष्यात काही बदलायची संधी मिळाली, तर पहाटेचा शपथविधी बदलाल का? फडणवीस म्हणतात… 

राज्य सरकार कन्फ्युज आहे. परीक्षा कुणाच्या घ्यायच्या? आणि डिग्री जर विनापरीक्षेची मिळाली तर नोकरीसाठी अडचणी येतील. राज्य सरकारने कन्फ्युज होऊन निर्णय करु नये, असं यावेळी फडणवीस म्हणाले.

बोगस बियाणं प्रकरणात महाबीज असो की खाजगी कंपन्या कारवाया व्हायला हव्यात. चीनच्या दुतावासाने राजीव गांधी फाऊंडेशनला मदत दिली त्याचं उत्तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात का देत नाहीत? काँग्रेसने चीनला कुठली मदत केली? याचं उत्तर त्यांनी द्यावं. पीएम केअरमध्ये चीनच्या कंपनीनं मदत केली की नाही कुणालाच माहिती नाही, असंही फडणवीस म्हणाले.

इनसाईडरच्या मुलाखतीत फडणवीस काय म्हणाले होते?

“आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो,” असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुलाखतीदरम्यान केला होता. मुलाखतकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसोबतचे अनेक गौप्यस्फोट केले.

(Devendra Fadnavis talks on Ajit Pawar)

संबंधित बातम्या 

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबाबतचा इंटरेस्ट वाढला, त्यांच्याशी दोन मुद्द्यावर पटू शकतं : देवेंद्र फडणवीस